Header Ads

जिहे-कटापूरचे फुकट श्रेय घेवू नये ; भाजपच्या कामांचे काँग्रेसवाले पेढे का वाटतायत ? : अनिल देसाई satara

सातारा : जिहे-कटापूर योजनेला मंत्रिमंडळाची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळून 350 कोटींचा निधी जाहीर झाला आहे. याचे खरे श्रेय भाजप सरकारचेच आहे. मात्र, माणचे विद्यमान लोकप्रतिनिधी या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. वास्तविक मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ना. चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, ना. महादेव जानकर, ना. विजय शिवतारे बापू आदींची मंत्रीमंडळाच्या बैठकीत ऐतिहासिक झाला आहे. त्यामुळे भाजपने केलेल्या कामांचे पेढे काँग्रेसवाले वाटून लोकांची दिशाभूल करत आहेत. योजनांचे फुकटचे श्रेय घेण्यापेक्षा गेल्या साडेनऊ वर्षात ही योजना व टेंभूचे पाणी माण-खटावमध्ये यावे, यासाठी आपण काय केले, असा सवाल जनता करत आहे, त्या जनतेच्या प्रश्‍नाचे उत्तरे द्यावेत, असे आव्हान भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात अनिल देसाई यांनी म्हटले आहे की, आपण आणि डॉ. दिलीप येळगावकर यांनी 18 सप्टेंबर 2018 रोजी जिहे-कटापूरमधून पाणी आंधळी धरणतून उचलून उत्तर माणच्या 32 गावांना द्यावे, अशी मागणी म्हसवड येथील जाहीर सभेत ना. चंद्रकांतदादा व ना. महादेव जानकर यांच्या मार्फत महाराष्ट्र शासनाकडे केली होती. त्यानंतर सातत्याने या मागणीचा पाठपुरावा केला आहे. मागील दीड महिन्यापूर्वी याप्रश्‍नी ना. गिरीश महाजन यांच्यासमवेत बैठक लावून राणंद तलाव, तलाव झाशी तलाव भरण्यासाठी पाणी राखीव करण्यात तत्तवः मान्यात घेतली. या बैठकीला माझ्यासह डॉ. दिलीप येळगावकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे, रणजितसिंह देशमुख, डॉ. संदीप पोळ व माण तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

काल झालेला हा ऐतिहासिक निर्णय भाजप व युती सरकारने घेतलेला असून त्याचे खरे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, रासपचे अध्यक्ष ना. महादेव जानकर, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे आहे. असून इतर कोणी याचे श्रेय घेवू नये.

माणच्या विद्यमान लोकप्रतिनिधींनी पाच वर्षांपूर्वी औंध भागातील 16 गावांतील लोकांना तत्कालिन मुख्यमंत्री चव्हाण आणि तत्कालिन राज्यपाल यांना भेटवले होते. या सोळा गावचे शिष्टमंडळ भेटवून तिथला पाणी प्रश्‍न सोडवतो, असे आश्‍वासन दिले होते. त्याचे पुढे काय झाले, अशी येथील प्रश्‍न विचारत आहे. विखळेत आणि कुकुडवाड येथे झालेल्या टेंभू योजना पाणीपरिषदेमध्ये सभेत भाषणबाजी करताना एक महिन्याच्या आत 32 गावांच्या दोन्ही पाणी योजनेसाठी 250 कोटी महिन्याच्या आत मंजूर करणार असे तुम्ही म्हणाला होतात. त्याचे पुढे काय झाले? याची उत्तरे अगोदर जनतेला द्या. भाजपच्या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नका. भाजपने केलेल्या कामांचे पेढे काँग्रेसवाले का पेढे वाटत आहेत, अशी नागरिकांत चर्चा आहे. या कामाचे श्रेय घेण्याचा फुकटखस प्रयत्न करू नये. कारण कुणी कामे केले हे माणच्या जनतेला माहित आहे, असा टोलाही अनिल देसाई यांनी प्रसिद्धपत्रकात लगावला आहे.

No comments