Header Ads

भैरवगडच्या चार वाडयांना अतिवृष्टीमुळे मोठमोठ्या भेगा, १२३ कुटुंबाला प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी हलविले satara

सातारा : भैरवगड ता. सातारा या गावांतर्गत टोळेवाडी, मानेवाडी, पिरेवाडी व गवळणवाडी या चार वाड्या येतात. या वाड्यांना अतिवृष्टीमुळे मोठ मोठ्या भेगा पडल्या आहेत. मोठा अपघात होण्यापूर्वीच  या लोकांची भैरवगड व आसपासच्या गावांमधील घरांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची सोय केली आहे. आज जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. या अतिवृष्टी बाधितांना आज जिल्हा प्रशासनाने जीवनावश्यक वस्तुचा पुरवठा केला. प्रशासनाकडून गहू, तांदूळ व डाळ तसेच विविध संस्थाकडून मिळालेल्या वस्तुंचे वाटप आज भैरवगड येथे करण्यात आले. यावेळी सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, प्रांताधिकारी स्वाती देशमुख, तहसीलदार आशा होळकर, जिल्हा परिषद सदस्य मनोज घोरपडे आदी उपस्थित होते. अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या टोळेवाडी वाड्याची जिल्हाधिकारी यांनी पहाणी केली. यावेळी त्या म्हणाल्या भैरवगड गावांतंर्गत येणाऱ्या टोळेवाडी, पिरेवाडी आणि गवळणवाडी या वाड्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. त्यांची घरे राहण्या योग्य नसून त्यांची इतर घरांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. चार वाड्यांची  123 कुटुंबातील 589  नागरिकांचे  तात्पुरती राहण्याची सोय करण्यात येणार आहे. तसेच त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.

शेती व घरांचे पंचनामे तात्काळ करा जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

भैरवगड ता. सातारा या गावाअंतर्गत टोळेवाडी, मानेवाडी, पिरेवाडी व गवळणवाडी या चार वाड्यांना अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे. या गावातील शेतीचे व घरांचे पंचनामे तात्काळ करा. अतिवृष्टी बाधीतांना सर्व सुविधा पुरवा. त्यांच्या मागणीनुसार जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करा. तसेच येथील नागरिकांच्या आरोग्यासाठी 24 तास आरोग्य पथक कार्यरत ठेवा,  अशा सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

No comments