Header Ads

टाटा पॉवर सोलर विरोधात दि.२० ऑगस्ट पासून भूमिपुत्र सुरक्षा रक्षकांचे आंदोलन satara

सातारा : गेली ६ वर्षापासून पळसावडे गावातील सुमारे २५ ते ३० सुरक्षा रक्षक टाटा पॉवर सोलर कंपनीमध्ये कार्यरत आहेत. कंपनीतील इतर कर्मचा-यांप्रमाणे आम्हाला दिखील मानधन मिळावे. कंपनीमध्ये ४ महिन्यापूर्वी दाखल झालेल्या कर्मचा-यांना १४ हजार ८०० रुपये पगार दिला जातो. त्याप्रमाणे आम्हाला देखील पगार मिळावा अन्यथा दि.२० ऑगस्ट पासून भूमिपुत्र सुरक्षा रक्षकांच्या वतीने कंपनीच्या मुख्यालयावर आंदोलन करणार असल्याचा इशारा सुरक्षा रक्षकांनी निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात पुढे असे नमूद केले आहे, भविष्यात कंपनीच्या वतीने पगारवाढ होत असताना आम्हा सुरक्षा रक्षकांचा विचार करावा. गेल्या दीड वर्षातपासून आमच्या पगारात कोणतीही वाढ झालेली नाही. दरम्यान आमच्या मागणीचा तात्काळ विचार व्यवस्थापणाने करून आमच्या मागण्या मान्य कराव्या अन्यथा २० ऑगस्ट पासून भूमिपुत्र सुरक्षा रक्षक आंदोलन करणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

No comments