Header Ads

दररोज हजारो वाहने वाहतूक करण्याऱ्या आनेवाडी टोलनाक्यावर शुकशुकाट satara

सातारा : गेल्या आठवड्यात विक्रमी पावसाची नोंद झाली असून अनेकांना गैरसोय व मनस्ताप सहन करावा लागला आहे. मात्र, आनेवाडी टोलनाका हा नेहमीच वादग्रस्त ठरला असला तरी अतिवृष्टीमुळे सध्या टोल नाक्यावर शुकशुकाट पसरला आहे. दररोज हजारो वाहनांची या ठिकाणी ये-जा होत असते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार असलेल्या हा रस्ता पुणे- बेंगलोर महामार्ग म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र राज्यातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर हे जिल्हे व पुढे कर्नाटक राज्यात हा महामार्ग जातो. त्यामुळे खूप मोठी वाहनांची संख्या या ठिकाणी पाहण्यास मिळते. तसेच वादावादी, हाणामारी, तोडफोड, दादागिरी असे अनेक प्रकार या टोलनाक्यावर पाहण्यास मिळतात. पण, यंदाच्या ऑगस्ट महिन्यात पहिल्याच आठवड्यात पावसामुळे वाहनांच्या चाकाला ब्रेक लावावे लागले आहेत. जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेतली असून सातारा जिल्ह्यातून सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात जाणाऱ्या वाहनांची रस्त्यालगत रांगा लावल्या आहेत. अनेक पुलावरुन पुराचे पाणी वाहत असल्याने वाहतुकीसाठी वाहन चालविणे धोकादायक ठरू शकते म्हणून ही वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्याच्या हद्दीत सुमारे ८०० ते ९०० विविध प्रकारची चार चाकी अवजड वाहने तसेच आराम गाड्या अडकून पडल्या आहेत. या वाहनांच्या चालक, क्लीनर व इतर प्रवाश्यांना निवारा व अन्न-पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागली आहे. विशेष म्हणजे काही अपवाद वगळता सातारा जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी व त्यांच्या प्रसिद्धीमुख कार्यकर्त्यांनी  कोणत्याही प्रकारची मदत केंद्र उभारली नाहीत. सेनादल, जिल्हा प्रशासन, पोलीस दल, स्वयंसेवी संस्थांनी मदतीचा भार उचलला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे हे सातारा जिल्ह्यात फिरकले नाहीत. तर काही अधिकारी नागरिकांनी सतर्क राहावे, पुराच्या पाण्यातून प्रवास किंवा वाहने घेऊन जाऊ नये तसेच विविध सूचना करीत असेल तरी मोठ्या प्रमाणात नागरीवस्ती मध्ये झालेल्या अतिक्रमणे, बांधकामे याबाबत भाष्य करणे टाळताना दिसत आहे.

सध्या आनेवाडी व तासावडे येथील टोलनाक्यावर वाहनांची वर्दळ नसल्यामुळे टोल वसूल करणाऱ्या कामगारांची मोठी कपात झाली आहे. तसेच खाद्य पदार्थ व फळ विक्रते यांचा रोजगार बुडाला आहे. अशा अनेक कष्टकरी, शेतमजूर यांना ही फटका बसला आहे. त्याचा ही आर्थिक नुकसान भरपाई बाबत महसूल विभागाने त्वरित पंचनामा करावा अशी मागणी दलित सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रेमानंद जगताप, सह्याद्री फौंडशेनचे अध्यक्ष शंभू पवार व कामगार नेते तथा लोकजनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड यांनी केली आहे. 

No comments