Header Ads

सातारा जिल्हा महिला मोर्चाने मुख्यमंत्र्यांना पाठवल्या ५० हजार राख्या satara

सातारा : सातारा जिल्हयातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ऑनलाईन व प्रत्यक्ष अशा पन्नास हजार राख्या पाठवल्या गेल्या व महाराष्ट्रातून पंचवीस लाख राख्या मुख्यमंत्र्यांना मिळाल्या. या विक्रमाची नोंद गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेण्यात आल्याची माहिती भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा कविता कचरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सुवर्णा साखरे, नयना भगत, सीमा निकम, गुलनाज पठाण, शुभांगी रासकर, सुवर्णा राजे, संगीता भोसले यावेळी उपस्थित होत्या.


सातारा जिल्हाला पन्नास हजार राख्यांचे टार्गेट आम्ही महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष माधवी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शक्ती सन्मान महोत्सवाअंर्तगत पूर्ण करण्यात आल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. या जागतिक विक्रमाचा सातारा जिल्हा हिस्सा बनल्याचे आम्हाला समाधान असल्याचे कविता कचरे यांनी सांगितले. येत्या २७ तारखेला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर या प्रज्वला बचत गट मेळाव्यासाठी सातारा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. हे महिला मेळावे कराड, सातारा व वाई येथे होणार आहेत.

No comments