Header Ads

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्यावतीने कोल्हापूर जिल्हयातील जनावरांना १०० टन चा-याचे वाटप satara

सातारा : अतिवृष्टीमुळे महापूराचा फटका बसल्याने कोल्हापूर जिल्हयातील अनेक गावे आणि हजारो कुटुंब बाधित झाली. पूरग्रस्तांबरोबरच जनावरांच्या चा-याचा प्रश्न गंभीर झाला होता. ही गरज ओळखून जिल्हयातील हातकणंगले, शिरोळ, करवीर तालुक्यातील जनावरांना 100 टन  चा-यांचे वाटप जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्यावतीने माजी खासदार राजू शेट्टी आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

ऑगस्ट महिन्यांच्या पहिल्या आठवडयात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्हयात महापूर आला. या महापूरामुळे कोल्हापूर जिल्हयातील अनेक गावे पूरग्रस्त झाली. नागरिकांबरोबरच जनावरांनाही त्याचा फटका बसला. आता पूर ओसरु लागला असून पूरग्रस्त आणि जनावरांच्या पुर्नवसनाची गरज आहे. पूरग्रस्तांना अनेक ठिकाणाहून मदत येत आहे परंतु  सध्या जनावरांना तातडीने चा-याची आवश्यकता आहे ही गरज ओळख सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणा-या जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्यावतीने चा-याचे वाटप करण्यात आले. यावेळी कोल्हापूर जिल्हयातील शिरोळ तालुक्यातील शिरोळ (पद्मराज हायस्कूल), शिरोळ (अर्जूनवाड रस्ता), घालवाड आणि उदगाव धरणग्रस्त वसाहत, हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी (महासत्ता चौक), इचलकरंजी (लिंबू चौक), इचलकरंजी नाटयगृह, लाटवडे, भेंडवडे, खोची, वडगाव, वाठार, शिरोली पुलाची, हिंगणगाव, पारगाव, रुई, करवीर तालुक्यातील शिये या पूरग्रस्त गावातील जनावारांसाठी चारा वाटप करण्यात आले. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी,  आमदार उल्हास पाटील, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती सावकार मादनाईक, दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील, महान कार्य न्यूज चॅनेलचे संपादक विजय पवार, आमदार सुजित मिणचेकर, कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्य प्रविण यादव, माजी आमदार राजीव आवळे, जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानचे विश्वस्त महंतेश राजशेखर कोकळकी, श्री. अवसरे, पश्चिम महाराष्ट्र  उपपीठ व्यवस्थापक शैलेश काळे, पुणे जिल्हा विभागीय निरीक्षक आप्पा गुंड, श्री. विश्वास समगिर, राजेंद्र भुयार, ज्ञानेश्वर टाकळकर, फुलचंद ढेरे, निलेश दांगट, संभाजी हरगुडे, प्रोटोकॉल अधिकारी धनवडे, लक्ष्मण पाटील, जिल्हा सेवाध्यक्ष रमेश लोकरे, जिल्हा सेवा निरीक्षक सुशांत मोरे, जिल्हा सेवा समिती पदाधिकारी, शिरोळ तालुका  सेवा समिती, हातकणंगले तालुका सेवा समिती आणि जिल्हयातील भक्तगण उपस्थित होते.

No comments