Header Ads

आपत्तीग्रस्तांचे पुर्नवसन ही एक सामाजिक बांधिलकी : सौ. वेदांतिकाराजे satara

सातारा : अतिवृष्टी आणि महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सातारा तालुक्यातील मोरेवाडी येथे डोंगर खचल्याने शेकडो घरे बाधीत झाली आणि ही कुटुंबे अक्षरश: उघड्यावर आली. नैसर्गिक आपत्तीमुळे या कुटूंबांचे न भरुन येणारे नुकसान झाले असून या सर्व कुटूंबांचा संसार नव्याने सुरु करण्यासाठी शासनासह समाजातील प्रत्यके घटकाने मतद केली पाहिजे. आपत्तीग्रस्तांचे पुर्नवसन ही एक सामाजिक बांधिलकी असून ही जबाबदारी सर्वांनी पार पाडून आपत्तीग्रस्तांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.

अतिवृष्टी, मुसळधार पाऊस आणि महापूर अशा आपत्तींमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सातारा तालुक्यातील मोरेवाडी येथे डोंगर खचल्याने शेकडो घरे बाधीत झाली असून श्रीमंत छ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या सुचनेनुसार प्रशासनाने या सर्व कुटूंबीयांना सुरक्षित जागी स्थलांतरीत केले होते. दरम्यान, मोरेवाडी येथे जावून कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी बाधीत कुटूंबांची भेट घेतली. या सर्व कुटूंबीयांना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ब्लँकेटचे वाटप केले होते. सौ. वेदांतिकाराजे यांनी या सर्व कुटूंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. तसेच बाधीत कुटूंबीयांच्य जनावरांच्याही निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून जनावरांसाठी निवारा करुन द्यावा, अशी मागणी बाधीतांनी केली. यानंतर सौ. वेदांतिकाराजे यांनी स्वतः जनावरांसाठी शेड बांधुन देण्याची ग्वाही दिली.

सातारा आणि जावली तालुक्यात पावसाने अक्षरश: थैनाम घातले असून सर्वत्र अतीवृष्टीमुळे जनजीवन ठप्प झाले आहे. अशातच अनेक ठिकाणी जमीन खचण्याचे प्रकार घडत आहेत. सातारा तालुक्यातील मोरेवाडी येथे भुस्खलन होवून डोंगरावर भेगा पडल्या आहेत. पावसाच्या पाण्यामुळे खचलेला डोंगराचा भाग गावावर कोसळण्याची भिती निर्माण झाली होती. शिवेंद्रसिंहराजे यांनी घटनास्थळी भेट देवून बाधीत घरांची पाहणी करुन त्यांचे स्थलांतरही केले होते. दरम्यान, पावसाने थोडी उघडीप दिल्याने सौ. वेदांतिकाराजे यांनी मोरेवाडी येथे पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, पवारवाडीचे सरपंच हणमंत पवार, मोरेवाडीचे सरपंच बजरंग मोरे यांच्यासह सदस्य, मंडलाधिकारी, तलाठी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सौ. वेदांतिकाराजे यांनी मोरेवाडी येथील डोंगर आणि बाधीत घरांची पाहणी केली. पाऊस कमी झाल्याने आता बाधीत कुटूंबांचा उघड्यावर आलेला संसार सावरणे यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहेत. त्यादृष्टीनेच सौ. वेदांतिकाराजे यांनी मोरेवाडी येथील बाधीत कुटूंबीयांशी चर्चा केली आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी सर्व कुटूंबीयांना जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. कुटूंबीयांच्या मागणीनुसार त्यांच्या जनावरांसाठी निवारा बांधुन देण्याचे आश्वासन सौ. वेदांतिकाराजे यांनी यावेळी दिले आणि तातडीने काम सुरु करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच मोरेवाडीतील सर्व बाधितांचे संसार पुर्ववत होण्यासाठी हवे ते सहकार्य केले जाईल. प्रशासनानेही तातडीने बाधीतांना मदत द्यावी, यासाठी तातडीने पावले उचलावीत असेही सौ. वेदांतिकाराजे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले.

No comments