Header Ads

खा.उदयनराजे भोसले यांनी जिल्ह्याचे नेतृत्व करावे ; तुम्ही म्हणाल तशीच वाटचाल होईल : आ.शशिकांत शिंदे SATARA

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्ह्याचे नेतृत्व करावे, त्यासाठी आम्ही सर्व आमदार त्यांच्यासोबत आहोत. पण त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सोडू नये, अशी ऑफर आमदार शशिकांत शिंदे यांनी उदयनराजेंना दिली आहे. उदयनराजे यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पुरपरिस्थितीसह इतर कामांबाबतचे निवेदन दिले. यावेळी भाजप प्रवेशाची ऑफरही मुख्यमंत्र्यांकडून उदयनराजेंना मिळाली. पण आगामी गणिते जुळत असतील तर प्रवेशाचा विचार करण्यावर उदयनराजे ठाम आहेत. याभेटीनंतर त्याच दिवशी रात्री खासदार उदयनराजे व राष्ट्रवादीचे पक्ष प्रतोद आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी एकत्र भोजन घेतले. दोघांत तासभर कमराबंद चर्चाही झाली. त्यानंतर पुण्यातही दोघांनी आगामी वाटचाल व भुमिकेबाबत चर्चा केली. या दोन्ही चर्चेत आमदार शशिकांत शिंदे यांनी उदयनराजेंना आपण जिल्ह्याचे नेतृत्व करावे, त्यासाठी आम्ही सर्व आमदार तुमच्यासोबत आहोत. तुम्ही म्हणाल तशीच वाटचाल होईल. पण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सोडू नका, अशी ऑफर दिली आहे. 

No comments