Header Ads

सातारा तालुक्यातील पुरग्रस्तांसाठी तात्पुरत्या निवारा कॅम्पची व्यवस्था satara

सातारा : सातारा  तालुक्यातील पुरग्रस्तांसाठी तात्पुरत्या निवारा कॅम्प उभारण्यात आले असून  त्या कॅम्प वर जाण्यासाठीचा मार्ग आणि तेथील संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे भैरवगड (टोळेवाडी) रिलीफ कॅम्प पिरेवाडी. कॅम्पमधील लोकसंख्या 300- पिरेवाडी येथे जाण्याचा मार्ग-सातारा-नागठाणे-पाडळी-निनाम-मांडवे-भैरवघाट चढून-भैरवगड (पिरेवाडी). संपर्क क्रमांक श्री. नारायण जावळीकर मंडळ अधिकारी, नागठाणे मो. क्र. 9403683315 / 7038138881.

बेंडवाडी,ता.सातारा रिलीफ कॅम्प परमाळे कॅम्पमधील लोकसंख्या 65, परमाळे येथे जाण्याचा मार्ग - सातारा - बोगदा मार्गे, कुरणेश्वर मंदिर - सोनगाव - शेळकेवाडी - आष्टे (पुर्नवसन)- कुमठे - मापरवाडी -शेरेवाडी - कुसवडे - पिलाणी घाटमार्गे - परमाळे संपर्क क्रमांक- श्री. नितीन घोरपडे मंडळ अधिकारी, शेंद्रे. मो. क्र. 9881789900.

बोपोशी (मोरेवाडी), ता. सातारा  रिलीफ कॅम्प मोरेवाडी. कॅम्पमधील लोकसंख्या 180, मोरेवाडी येथे जाण्याचा मार्ग - सातारा - बोगदा मार्गे, उजवीकडे - डबेवाडी - मानेवाडी - भोंदवडे - गजवडी - गजवडीतून डावीकडे - बोरणे घाटमार्गे - पवनगांव फाटा - मोरेवाडी. संपर्क क्रमांक- श्री. मोहिते मंडळ अधिकारी, परळी. मो. क्र. 9403683266.

No comments