Header Ads

पालकमंत्र्यांनी पाटण तालुक्यात नको त्या ठिकाणी फिरून दिखावा केला : राजाभाऊ शेलार patan

पाटण : पालकमंत्री ना.विजय शिवतारे यांनी पाटण तालुक्यात येऊन खऱ्या पूरग्रस्तांना न भेटता कोयना विभागात ते अजिबात ते फिरकलेच नाहीत. नको त्याठिकाणी फिरून त्यांनी दिखावा करून राजकीय शेरेबाजी केली. त्यांचे वर्तन हे अत्यंत चुकीचे होते त्यांचा सर्व सदस्यांच्यावतीने राजाभाऊ शेलार यांनी सभेत जाहीर निषेध व्यक्त केला. तर पाटण तालुक्यात निसर्गाचा प्रकोप होऊन अचानक आलेल्या महापुरामुळे जनावरे, घरांचे, शेतीचे, रस्त्याचे तालुक्यात प्रचंड नुकसान होऊन लोकांवर आस्मानी संकट आले आहे. नुकसानीचे सरसकट पंचनामे करून भरपाई मिळावी. तसेच पाटण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसह जेथे अतिवृष्टी होते तिथे पावसाळी सुट्टी जाहीर करण्याची मागणी राजाभाऊ शेलार यांनी करून सभेत तसा ठराव करण्यात आला. पंचायत समितीच्या छ.शिवाजी महाराज सभागृहात सभापती उज्वला जाधव यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा पार पडली. यावेळी उपसभापती राजाभाऊ शेलार, गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती नानासाहेब गुरव यांचे निधन झालेने तसेच पुरात मृत पावलेल्या पूरग्रस्तांना सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात आली.

महापुरामुळे तालुक्यात मोठे नुकसान झाले असून तातडीने सरसकट पंचनामे झाले पाहिजेत. दुर्गम ठिकाणी असणाऱ्या मळे, कोळणे, पाठरपुंज येथे सर्वाधिक पाऊस पडला आहे. त्या ठिकाणी देखील मोठे नुकसान आहे. यांचे पंचनामे करताना पाटण तालुक्याला वेगळा निकष लावून जास्तीत-जास्त कशी भरपाई मिळेल यादृष्टीने करावेत. अशा सूचना राजाभाऊ शेलार यांनी अधिकाऱ्यांना केल्या. महापुरामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी. तसेच राजकारण न करता पंचनामे करावेत अशी मागणी सदस्य बबन कांबळे यांनी केली.

शिक्षण विभागाचा आढावा देताना गटशिक्षण अधिकारी जगताप यांनी तालुक्यात ९१ शाळांची अतिवृष्ठीमुळे नुकसान झाले आहे. शालेय पोषण आहार, वह्या, पुस्तके ही पाण्यामध्ये भिजून खराब झालेली असल्याची त्यांची माहिती जिल्हा कमिटीकडे दिलेली आहे. गणेवेश निधी प्राप्त झाला असून ते अनुदान शाळांच्या खात्यावर जमा केले आहेत. अतिवृष्टी झालेल्या शेतीचे पंचनामे सुरु असल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा आढावा देताना ८६ गावांचे अतिवृष्टीने नळपाणी पुरवठा योजनांचे नुकसान झाले आहे. त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश आम्हाला देण्यात आलेले आहेत असे त्यांनी सांगितले. विशेष दुरुस्तीमद्ये नळ योजनांचे तातडीने पंचनामे करा अश्या सूचना उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी केल्या. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या आढाव्याप्रसंगी तांबवे पूलाची जी अवस्था झाली ती तालुक्यातील काही पूलांची होऊ शकते. पूरामध्ये बुडलेल्या सर्व पूलांचे स्ट्रक्चरल आँडिट करा. नेरळे पूलाची अवजड वाहनांची वाहतूक बंद आहे त्याची पाहणी करा, अश्या सूचना सभापती उज्वला जाधव यांनी अधिकाऱ्यांना केल्या. पाटवडे रस्त्यावरती पर्यायी उपाययोजना कराव्यात तसेच गुजरवाडी रस्त्याची ही पाहणी करावी अशी मागणी सदस्या उज्वला लोहार यांनी केली. मृत जनावरे व वाहुन गेलेल्या जनावरांचे तातडीने पंचनामे करावे असे उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी सांगितले. त्यानंतर विद्युत महामंडळाचा आढावा देताना, आटोली, पाचगणी व बोर्गेवाडी या ठिकाणी विद्युत पुरवठा बंद आहे. सध्या सर्व अधिकारी व कर्मचारी फिल्डवर काम करत आहेत. कोयना काठावरती अनेक शेतीच्या योजना आहेत शासन जर नोटिसा देऊन हात मोकळे करत असेल तर ते बरोबर नाही. त्या मोटारींचे पंचनामे करावे व त्यांना नुकसान भरपाई राज्य शासनाने द्यावी असे उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी सांगितले. ग्रामपंचायत विभागाचा आढावा देताना विस्तार अधिकारी जयवंत वाघ यांनी अतिवृष्टीमुळे १३५६ घरांचे नुकसान झालेले आहेत. पूर्ण पडलेल्या घरांची २६ संख्या आहे. वनविभागाचा आढावा देताना, काही ग्रामपंचायतींनी रोप घेऊन गेली व ढिग लावून ठेवलेली आहेत ती रोप लावण्यात यावी अशी मागणी पं.स सदस्य प्रतापराव देसाई यांनी केली. पंचायत समिती शेती विभागाचा आढावा देताना, तालुक्यामध्ये पिकांचे नुकसान झालेले आहेत. त्यांचे ३ ते ४ दिवसात सर्व पंचनामे होतील. सभेच्या शेवटी आभार उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी मानले.

कलेक्टर मँडमच्या दौऱ्यामद्ये नेमके किती अधिकारी पळतात : राजाभाऊ शेलार

पं.स मासिक सभा सुरु असताना अनेक अधिकारी अनुपस्थित होते. तालुक्यामध्ये पूरस्थिती असताना तातडिने पंचनामे होणं गरजेचं आहे. मात्र अनेकांच्या दौऱ्यामुळे अधिकारी वर्ग त्यांच्या मागे पळत आहे. मग पंचनामे होणार केव्हा ? असे मत पं.स.उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी व्यक्त केले. तसेच सभागृहातील दुसरं चाक कुठे आहे ? कलेक्टर दौऱ्यामध्ये पं.स.सदस्यांनी जाने चूकिचं आहे. लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी अधिकाऱ्याच्या मागे फिरण्यासाठी नाही. असे उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी टोला मारला.

No comments