Header Ads

माण तालुक्यातील उत्तर भागातील ३२ गावांच्या पाण्याचे खरे श्रेय युती शासनाचे : शेखर भाऊ गोरे man

बिजवडी : माण तालुक्याच्या उत्तर भागातील ३२ गावांना जिहे कटापूर सिंचन योजनेतून पाणी देण्याचा प्रश्न भाजपा-शिवसेना युती मुळे निकाली निघाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिलेला शब्द खरा करून दाखवला आहे.या योजनेसाठी युती शासनाने प्रशासकीय मान्यता देऊन ३५० कोटींचा निधी जाहीर केला आहे.याबद्दल युती शासनाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.त्यांच्या या निर्णयामुळे माण तालुक्यातील उत्तर भागातील वर्षानुवर्षे पाण्यापासून वंचित राहिलेल्या जनतेला दिलासा मिळाला आहे. युती शासनामुळे उत्तर माणच्या भागात आज या योजनेला प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे.पण यासाठी भाजप - शिवसेनेचे नेतेमंडळी ,पदाधिकारी , कार्यकर्त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला असताना स्वार्थापोटी नेहमीच दुसऱ्याचे श्रेय घेत झंकी करण्याची सवय असलेले माणचे कॉग्रेसचे आमदार पुन्हा एकदा श्रेय लाटताना दिसून येत आहेत.आघाडी शासन असतानाही अन नसतानाही त्यांचा काहीही संबंध नसताना श्रेय लाटण्याची सवय त्यांची कधीच जाणार नाही.जिहे कटापूर योजनेचा जन्म युती शासनाने घातला असून ती पूर्णत्वाकडेही युती शासनच नेत आहे.माणच्या कॉग्रेसच्या आमदारांनी या योजनेचे श्रेय घेऊ नये ते युती शासनाचेच असल्याचे प्रतिपादन माण खटाव शिवसेना नेते शेखरभाऊ गोरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे  केले आहे.

जिहे कटापूर सिंचन योजनेचे पाणी उत्तर माणच्या वंचित गावांना मिळावे यासाठी शिवसेना उपनेते व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना.नितीन बानुगडे पाटील ,पालकमंत्री ना.विजयबापू शिवतारे ,ना.चंद्रकांतदादा पाटील यांचेकडे माण तालुक्यातील भाजपा शिवसेनेच्या नेतेमंडळींनी , पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता.मंत्री महोदयांनी उत्तर माणच्या पाण्याचा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे ,जलसंपदामंत्री ना.गिरीष महाजन यांच्या समोर मांडून ही योजना मार्गी लावून यासाठी प्रशासकीय मंजूरी मिळवली आहे. माण आणि खटाव तालुक्यांची लाईफलाईन ठरणाऱ्या जिहेकठापूर उपसा सिंचन योजनेसाठी शिवसेना उपनेते ना.नितीन बानुगडे पाटील सहकाऱ्यांच्या साथीने गेल्या दहा वर्षांपासून अहोरात्र काम करत आहेत. पहिल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात जिहेकठापूरसाठी शेकडो कोटींचा निधी मिळवला होता. या योजनेच्या वाढीव खर्चाला सध्याच्या युती सरकारने सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली आहे.

जिहेकठापूर योजनेच्या पहिल्या टप्प्यात खटाव तालुक्यातील नेर धरणात पाणी आणून येरळा नदी प्रवाही करण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यात आंधळी धरणात पाणी आणून माणगंगा नदी प्रवाही करुन नदीवरील बंधारे भरुन घेण्यात येणार आहेत.पाणीप्रश्नासाठी पदाचा त्याग करावा लागला तरी चालेल पण दुष्काळी भागांना पाणी मिळावे हा एकच निर्धार बानुगडे सरांनी केला होता. बानुगडे सरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माढ्याचा खासदार निवडून आणण्याचा शब्द दिला होता. मुख्यमंत्र्यांनीही माणखटावचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी लागेल ती मदत करण्याचा शब्द दिला होता. माण तालुक्याच्या उत्तर भागातील ३२ गावांना कोणत्याच योजनेचे पाणी मिळत नसल्याचे तसेच शेतकऱ्यांनी आंधळी धरणातील पाणी उचलून नेण्याचे शक्य नसल्याचे सांगून जिहेकठापूर सुधारित योजना मांडली. आंधळी धरणात आलेले पाणी उचलून टाकेवाडी परिसरातील उंच ठिकाणी साठवून वंचित राहिलेल्या माणच्या उत्तर भागातील ३२ गावांना देण्यासाठी प्रयत्न केले. मुख्यमंत्र्यांनीही दिलेला शब्द पाळत आज कँबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत सादर केलेल्या या योजनेला प्रशासकीय मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.बानुगडे सरांबरोबरच ,पालकमंत्री त्यांचे सहकारी, तसेच भाजपाचे चंद्रकांत दादा भाजपाचे पदाधिकारी यांचे हे श्रेय असताना कॉग्रेसचे आमदार खोट्या श्रेयाची टिमकी वाजवताना दिसून येत आहेत. आघाडी शासनात असतानाही कॉग्रेसचे हे झंकी आमदार काहीही न करता दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेत होते. आतातर त्यांचे शासनही नाही तरीही ते पुन्हा एकदा मीच केल म्हणून मिरवताना दिसून येत आहे.त्यांच्या या भूलथापांना माण खटावची जनता आता बळी पडणार नाही.सत्ता असो वा नसो हे महाशय दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेण्यात पटाईत असले तरी यापुढे त्यांचे हे खोटे उद्योग चालणार नाहीत .युती शासनाचे श्रेय असताना दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय घेण्याची सवय सोडून द्या असा इशाराही कॉग्रेसच्या आमदारांना शेखरभाऊ गोरे यांनी दिला आहे.

पाण्याच्या मुद्द्यावरच लोकसभेला आपला युतीला पाठिंबा..

दुष्काळी माण खटाव तालुक्याचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठीच आपण लोकसभा निवडणूकीदरम्यान भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता.त्यावेळी मुख्यमंत्री महोदयांना आपण शब्द दिला होता.माढयाचा खासदार भाजपाचाच असेल तुम्ही फक्त आमच्या दुष्काळी भागाचा पाणीप्रश्न सोडवा.निवडणूकीत आपण स्वतंत्र प्रचारयंत्रणा राबवत माढ्याचा खासदार भाजपाचा करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. तो प्रयत्न फक्त माण खटावच्या जनतेच्या पाण्यासाठी होता. मुख्यमंत्र्यांनीही दिलेला शब्द खरा केला असून त्यांचे व युती शासनाचे जाहीर आभार...

कॉग्रेसच्या आमदारांची दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेण्याची सवय जूनीच..!

माण मतदारसंघात कॉग्रेसच्या आमदाराने जनतेला पाण्याचे नेहमीच गाजर दाखवत जनतेची चेष्टा केली आहे.मात्र त्याचा फायदा त्यांनी स्वार्थासाठी करून घेतला आहे.उरमोडीच्या पाण्याचे नाटक करून त्यांनी २०१४ ची विधानसभा निवडणूक जिंकली मात्र अजूनही उरमोडीच्या पाण्यासाठी त्यांच्याच नेत्यांना उपोषणे करावी लागत आहेत तर ते त्या आंदोलनाला पाठिंबा देत आहे.यावरून त्यांनी उरमोडीसाठी काय केले ते सर्वांना कळालेय.आता ते जिहे कटापूरच्या नावाखाली २०१९ ची निवडणूक जिंकण्याचा विचार करत आहेत. त्यांच्या या भूलथापांना आजा ही जनता फसणार नाही.दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेण्याची त्यांची सवयच जूनीच असून जनतेने ती ओळखली आहे.

No comments