Header Ads

खा.उदयनराजेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ; खा. उदयनराजेंच्या भाजपप्रवेशाच्या चर्चांना उधाण maha

मुंबई : राष्ट्रवादीचे बाहुबली नेते खा.श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेताच त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे. आज त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. नुकताच राष्ट्रवादीचे आमदार व त्यांचे चुलत बंधू शिवेंद्रराजे यांनी या भाजप प्रवेश केला असून रामराजे निंबाळकरदेखील लवकरच भाजपमधे दाखल होणार असाल्याच्या चर्चा जिल्हाभर सुरु आहे. यांच्या पाठोपाठ उदयनराजे देखील राष्ट्रवादीला सोडचिट्टी देणार असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुर परिस्थीतीबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे उदयनराजे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

No comments