Header Ads

पुरग्रस्तांच्या सोबत शरद पवारांनी केलं झेंडावंदन ; पूरग्रस्त महिलांनी बांधली शरद पवारांना राखी maha

कोल्हापूर : माजी  केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी १५ ऑगस्टच्या निमित्ताने पूरग्रस्त नागरिकांच्या सोबत ध्वजारोहण केलं. कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंग मधील पूरग्रस्त छावणीत पवारांनी ध्वजारोहण केलं. या छावणीत आंबेवाडी, चिखली सिद्धार्थनगर आणि सुतार मळा या परिसरातील पूरग्रस्त नागरिक राहायला आहेत. ध्वजारोहणानंतर पूरग्रस्त महिलांनी शरद पवारांना राखी बांधली. यावेळी पूरग्रस्तांची संवाद साधताना पवारांनी या महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले असून हे नुकसान मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पूरग्रस्तांच्या पाठीशी राहील असा विश्वास दिला. तसेच पूरग्रस्त नागरिकांना स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा देत नागरिकांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप पवार यांच्या हस्ते करण्यात आलं.

No comments