Header Ads

पूरग्रस्तांना माथाडी कामगारांच्या मजूरीतून ६० लाख रुपयेची मदत maha

नवीमुंबई : पश्चिम  महाराष्ट्राच्या सातारा,सांगली,कोल्हापूर जिल्ह्रात अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त झालेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी माथाडी कामगारांच्या मजूरीतून ६० लाख रुपयेचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे माथाडी कामगार नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी सुपुर्द केला, यावेळी कामगार मंत्री संजय कुटे उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात भेटण्यास गेलेल्या शिष्टमंडळांमध्ये नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचेबरोबर कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप,संयुक्त सरचिटणीस वसंतराव पवार,चंद्रकांत पाटील,रविकांत पाटील, अॅड्.भारतीताई पाटील, पतपेढीचे एम.डी रमेश अण्णासाहेब पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी,ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या कार्यकर्त्यांची माथाडी भवन,तुर्भे,नवीमुंबई याठिकाणी दि.10 ऑगस्ट रोजी  विविध माथाडी बोर्डाच्या टोळ्यांचे मुकादम,उपमुकादम,कार्यकर्ते,वारणार-मापाडी व पालावाला महिला आणि जनरल विभागातील कार्यकर्ते यांची सभा आयोजित केली होती,त्या सभेत पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राज्यातील अथवा देशातील जनतेवर कोणतीही नैसर्गिक आपत्ती ओढविल्यास त्यांना मदत करण्याची माथाडी कामगारांचे आराध्यदैवत स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांचेपासून संघटनेची परंपरा आहे,त्यानुसार माथाडी कामगार युनियनने " मुख्यमंत्री सहाय्यता निधी"  60 लाख रुपयेचा धनादेश  मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द केला. माथाडी कामगार युनियनच्यावतिने 50 लाख रुपये आणि अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार सहकारी पतपेढीच्यावतिने 10 लाख रुपये अशी एकूण 60 लाख रुपये रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी देण्यात आली. माथाडी कामगार हा कष्टाची कामे करणारा घटक आहे,त्याच्या मजूरीतून पूरग्रस्तांना दिली जाणारी आर्थिक मदत ही अत्यंत मोलाची आहे. स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या परंपरेनुसार माथाडी कामगार चळवळ कार्य करीत आहे.

No comments