Header Ads

कराड येथील पाटण कॉलनीत तृप्ती देसाई यांच्याकडून पूरग्रस्तांची विचारपूस ; मदतीच्या श्रेयावरून सरकारकडून राजकारण -: तृप्ती देसाई karad

कराड : अतिवृष्टी व महापुरामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे कराड येथील पाटण कॉलनीतील कुटुंबीयांचेही नुकसान झाले असून, याठिकाणी अजूनपर्यंत शासनाची तातडीची पाच हजार रुपयांची रोख रक्कम मिळालेली नाही. मात्र, इतर ठिकाणी रोख रक्कम दिली गेली आहे. याठिकाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे घर असल्यामुळे सूडबुद्धीने सरकारने ही मदत दिली नसल्याचे वाटते. मदत पोहोचली तर त्याचे श्रेय पृथ्वीराज चव्हाण यांना जाईल, या भीतीने सरकारने हे घाणेरडे राजकारण चालवले आहे, असा आरोप भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केला. कराड येथील पाटण कॉलनीत मंगळवारी दुपारी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी बाधित कुटुंबांची भेट घेतली व त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी भूमाता ब्रिगेडचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

देसाई म्हणाल्या, हातावर पोट असलेल्या लोकांच्या घरांची पडझड, अन्नधान्य, संसारोपयोगी वस्तू या गोष्टींच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, नागरिकांनी वैयक्तिकरीत्या मदत पोहोचवली आहे. मात्र, सरकारची पाच हजार रुपयांची तातडीची मदत अजूनही त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाही. पाटण कॉलनीत केवळ राजकीय द्वेषातून मदत देण्यात विलंब का केला जात आहे, याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचे उत्तर द्यावे, अशी संतप्त मागणी करत जर चोवीस तासांच्या आत येथील बाधितांना तातडीने रोख रक्कम व अन्य मदत दिली गेली नाही तर मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांना याबाबत जाब विचारू, असा इशारा यावेळी देसाई यांनी दिला.

सरकार आपत्ती व्यवस्थापनात अपयशी

गडहिंग्लज, शिरोळ ब्रह्मनाळ, सांगली अशा ठिकाणी सरकारची रोख रक्कम पोहोचलेली नाही. ज्या ठिकाणी पोहोचली आहे तेथे मदत घेण्यासाठी लोकांना पंधरा-पंधरा तास रांगेत उभा राहावे लागत आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन व नियोजनात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. महाराष्ट्रातील नागरिकांचे सरकारने पालकत्व स्वीकारले आहे, असे मत देसाई यांनी यावेळी व्यक्त केले.

No comments