Header Ads

इस्त्री करताना शॉक लागून युवकाचा मृत्यू karad

कराड : घरात कपड्यांना इस्त्री करत असताना शॉक लागून युवकाचा मृत्यू झाला आहे. रेठरे बुद्रुक ता. कराड येथे गुरुवारी ही घटना घडली. विशाल भानुदास इंगळे वय-१९ असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रेठरे बुद्रुक येथे अतिवृष्टीमुळे नदीला महापूर येऊन गेला आहे. यामध्ये विशाल राहत असलेले घर महापुराच्या वेढ्यात होते. महापूर ओसरल्यानंतर नुकतेच हे कुटुंब आपल्या घरी आले होते. पुराचा तडाख्यात बरीच गावे विस्थापित झाली होती. रेठरे बुद्रुकच्या ग्रामस्थांनाही सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. इंगळे कुटुंबीयही त्यादरम्यान तात्पुरते स्थलांतरित झाले होते. पूर ओसरल्यानंतर सर्वजण आपापल्या घरी राहायला गेले. अतिवृष्टीच्या पावसामुळे विशालच्या घराच्या भिंती ओलसर झाल्या होत्या. गुरुवारी सकाळी दहा वाजता विशाल घरातील इस्त्रीच्या साह्याने कपड्यांना इस्त्री करत होता. त्यावेळी इस्त्रीचा शॉक लागल्यामुळे तो बेशुद्ध पडला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. घटनेची नोंद पोलिसांत झाली असून, अधिक तपास हवालदार हादगे करत आहेत.

No comments