Header Ads

बकरी ईदचा खर्च टाळून कराड येथील मुस्लीम समाज करणार पुरग्रस्तांना मदत karad

कराड : पश्चिम महाराष्ट्रातील गंभीर पूरस्थितीचा विचार करुन शहर परिसरातील मुस्लिम बांधव बकरी ईद अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. बकरी ईदसाठी होणाऱ्या खर्चाला बगल देऊन ही रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा महत्त्वाचा निर्णय कराडकरांनी घेतला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पोलिस उप-अधीक्षक नवनाथ ढवळे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

पोलिस उप-अधीक्षक ढवळे यांच्या कार्यालयात शांतता कमिटीच्या बैठक झाली. त्यावेळी मुस्लीम बांधवांनी हा निर्णय जाहीर केला. माजी नगराध्यक्ष अल्ताफ शिकलगार, फारुक पटवेकर, भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, मनसे जिल्हाध्यक्ष अॅड. विकास पवार, इरफान सय्यद, अर्शदभाई मुजावर, अकबर शेख, साबीरमियाँ मुल्ला, आप्पासाहेब गायकवाड, नगरसेविका स्मिता हुलवान, सौरभ पाटील, बाळासाहेब यादव उपस्थित होते. सर्वांनी या निर्णयाचे स्वागत केले. यावेळी पूरग्रस्तांना केलेली व आणखी करावयाच्या मदतीविषयी विस्तृत चर्चा करण्यात आली. दरवर्षी जुलूस आणि मिरवणुकीने ईदगाहमध्ये जाऊन तेथे होणारी नमाजही यावर्षी होणार नाही. त्याऐवजी जामा मशिद, मक्का मशिदीसह शहर आणि परिसरातील विविध मशिदींमध्येच नमाज होणार आहे.

No comments