Header Ads

अपघातप्रकरणी एकावर गुन्हा crime

सातारा : संगमनगर येथे झालेल्या दुचाकीच्या अपघातप्रकरणी पृथ्वीराज नारायण शिंदे (रा. वेळे-कामथी, ता.सातारा) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा अपघात दि. २९ जुलै रोजी रात्री झाला होता व त्यात शिंदेंसह सुमित राजेंद्र कदम, शेखर शिवाजी कदम हे जखमी झाले होते. याची फिर्याद पोलीस हवालदार तेजश्री मोरे यांनी नोंदवली असून तपास हवालदार आर.व्ही.दळवी हे तपास करीत आहेत.

No comments