Header Ads

विनयभंगप्रकरणी दोघांना एक महिना साध्या कैदेची शिक्षा crime

सातारा : दौलतनगर परिसरातील एका महिलेला मारहाण करुन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी किरण पांडूरंग मोहोळकर वय-२३ व कांताबाई पांडूरंग मोहोळकर वय-५८, दोघे रा. दौलतनगर या दोघांना न्यायालयाने एक महिना साध्या कैदेची शिक्षा सुनावली. पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनूसार २०१५ मध्ये ही घटना घडली होती. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन हवालदार ससाणे यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र पाठवले होते. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील उज्वला पवार यांनी म्हणणे मांडले. त्यांना सहायक फौजदार एस. बी. भोसले व हवालदार जाधव यांनी सहाकार्य केले.

No comments