Header Ads

दैवी चमत्काराच्या भूलथापा देणाऱ्या साताऱ्यातील ज्योतिषाला शिक्षा crime

सातारा : दैवी चमत्काराच्या भूलथापा देत फसवणूक केल्याप्रकरणी साताऱ्यातील यादोगोपाळ पेठेतील विश्वास भालचंद्र दाते या ज्योतिषाला सातारा येथील मुख्य न्यायदंडाधिकारी ए.व्ही.कस्तुरे यांनी एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

यादोगोपाळ पेठेतील जोशीवाडा येथे विश्वास दाते हे राहण्यास असूत त्याच ठिकाणी त्यांचे ज्योतिष कार्यालय आहे. विविध प्रकारच्या ७२ दुर्धर आजारांवर इलाज करतो, भानामती, भूत, हडळ दुर करतो, असे सांगत त्याने अनेकांकडून पैसे उकळले होते. याची तक्रार अंनिसचे कार्यकर्ते मुराद पटेल (रा. शिरवळ) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदवली होती. यानुसार गुन्हा नोंद करत पोलिसांनी दातेला अटक केली होती. याचा तपास करुन सहाय्यक फौजदार शेडगे, हवालदार लेंभे, घोडके, कुमठेकर यांनी दोषारोपपत्र सातारा येथील न्यायालयात सादर केले  होते. यावरील सुनावणी पुर्ण झाल्यानंतर न्यायाधीश कस्तुरे यांनी दातेला १ महिना सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकारतर्फे ॲड. पुष्पा जाधव-माने यांनी काम पाहिले. त्यांना प्रॉसीक्यूशनचे हवालदार शशिकांत भोसले, एस.जी.जाधव यांनी मदत केली.

No comments