Header Ads

विनयभंगप्रकरणी जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल crime

सातारा : येथील एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी सातारा जिल्हा रुग्णालयातील दंत विभागातील कर्मचारी वैभव पवार (मूळ रा. खटाव, सध्या रा. सातारा) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्यास अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पीडित महिला ४३ वर्षीय असून त्या कामानिमित्त तेथे जात होत्या. मात्र, संशयित पवार हा मार्च महिन्यापासून त्यांचा पाठलाग करत होता. अनेकदा त्याने अश्­लील शेरेबाजीही केली. यामुळे संबंधित महिलेने त्याला जाब विचारत पुन्हा असे काही कृत्य करु नको, असेही बजावले होते. मात्र, पवार याने 'तू मला आवडतेस,' असे उत्तर दिले. यानंतर महिलेने वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितल्यानंतर 'मी सिव्हिल सर्जनच्या जवळचा माणूस असून तुम्ही काही बोललात तर तुमची व तुमच्या पतीची नाहक बदनामी करेन,' अशी धमकीही दिली. दरम्यान, मार्च ते दि. ३ ऑगस्टपर्यंत संशयित वैभव पवारकडून असे प्रकार सुरुच होते. त्याचा वारंवार त्रास होवू लागल्याने अखेर पीडित महिलेने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पवार याच्यावर विनयभंग, दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. यानंतर त्याला पोलिसांनी तातडीने अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून हवालदार एस. एच. मोहिते तपास करत आहेत.

No comments