Header Ads

कनेक्शन कट करण्यासाठी गेलेल्या वायरमनला चंदननगर मध्ये मारहाण crime

सातारा : कनेक्शन कट करण्यासाठी आलेल्या वायरमनला मारहाण केल्याप्रकरणी कोडोली येथील चंदननगर मध्ये राहणाऱ्या रमेश राजाराम निंबाळकर याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शाहूनगर मध्ये राहणारे सुनिल अरुण गवळी हे वीज वितरण कंपनीत वायरमन म्हणून नोकरीस असून त्यांना बिले न भरणाऱ्या ग्राहकांचे कनेक्शन तोडण्याच्या सुचना करण्यात आल्या होत्या. यानुसार गवळी हे कोडोलीच्या चंदननगर मधील रमेश राजाराम निंबाळकर यांचे कनेक्शन तोडण्यासाठी बुधवारी सायंकाळी गेले होते. यावेळी त्यांना निंबाळकरांनी शिविगाळ, दमदाटी करत पत्र्याच्या सुपाने मारहाण केली. याची तक्रार गवळी यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवली असून निंबाळकरांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास हवालदार पी.बी.शेवाळे हे करीत आहेत.

No comments