Header Ads

वर्चस्व वादातून कराडात गोळीबार करून एकाचा खून crime

कराड : शहरातील मध्यवस्तीत घरात घुसून युवकावर गोळीबार करण्यात आला. आठ ते दहा गोळ्या फायर करून त्याचा खून करण्यात आला. मंगळवारी ता.२० मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.  घटनेनंतर जमलेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. तर जमावाने एक दुचाकी जाळली असून रिक्षाचे नुकसान केले आहे. पवन दीपक सोळवंडे वय-२४, रा. बुधवार पेठ, कराड असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. दरम्यान या घटनेमागे कराडातील वर्चस्व वादाचे कारण असल्याचे बोलले जात आहे. गोळीबार करणाऱ्या संशयितांची नावे पोलिसांना समजली असून पोलिस त्यांच्या शोधात आहेत.

No comments