Header Ads

खा.श्री.छ.उदयनराजे भोसले मित्र समूह व आदर्श ट्रस्टकडून पूरग्रस्तांना स्वच्छतेचे साहित्य वाटप

सातारा : महापुराने कोल्हापूर, सांगली जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या पूरपरिस्थिती ओसरली असली तरी आता या दोन्ही जिल्ह्यांमध्ये स्वच्छतेचा व अन्नधान्याचा  प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यापार्श्‍वभूमीवर सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील आमणापूर गावात स्वच्छतेसाठी खराटे व फिनेलचे कॅन तसेच तांदळाचे वाटप खा.श्री.छ.उदयनराजे भोसले मित्र समूह व आदर्श ट्रस्टच्या वतीने करण्यात आले. यावेळी सातारा नगरपरिषदेचे नगरसेवक प्रशांत आहेरराव यांच्यासह खा.श्री.छ.उदयनराजे भोसले मित्र समूह व आदर्श ट्रस्टच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमणापूर गावात स्वच्छतेचे साहित्य देऊन तांदूळ वाटप केले.

सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली भयानक पूरपरिस्थिती आता निवळली आहे. मात्र पाणी पसरलेल्या भागात रोगराई पसरु नये म्हणून परिसराची स्वच्छता करण्यासाठी खा.श्री.छ.उदयनराजे भोसले मित्र समूह व आदर्श ट्रस्टचे संस्थापाक, अध्यक्ष प्रशांत आहेरराव यांनी सांगली येथील आमणापूर गावात स्वच्छतेच्या साहित्यासह दाखल झाले. पूर आलेल्या भागात चिखल, दलदल, मृत जनावरे, कुजलेल्या वस्तु यामुळे संसर्ग रोग व साथीचे रोग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत रोगराई पसरु नये म्हणून खराटे व फिनेलचे कॅनचे वाटप केले असल्याचे आहेरराव यांनी सांगितले. यावेळी सुधीर साखरे, संतू पवार, शैलेश गुजर, दीपक चव्हाण, विजय तावडे, नितीन पवार, आशुतोष निगडे, नंदकुमार महाडिक तसेच खा.श्री.छ.उदयनराजे भोसले मित्र समूह व आदर्श ट्रस्टचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

No comments