Header Ads

कराड आणि पाटण येथील पूरग्रस्तांना दिला पालकमंत्र्यानी मदतीचा हात ; पुरग्रस्तांसाठी पाठविले 6 हजार ब्लॅकेट satara

सातारा : कराड आणि पाटण तालुक्यातील पुरग्रस्तबाधीतांसाठी पालकमंत्री विजय शिवतारे यांनी  6 हजार ब्लॅकेट पाठवून दिले आहेत. यामध्ये कराड तालुक्यासाठी 2 हजार ब्लॅकेट तर पाटण तालुक्यासाठी 4 हजार ब्लॅकेट पाठवून दिले आहेत.   कराड येथे 2 हजार ब्लॅकेटचे वाटप विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थांचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते कराड तालुक्यातील पोतले, येरवळे, चचेगाव, सैदापुर, रेठरे खुर्द, दुशेरे, कोडोली, कार्वे, रेठरे बुद्रुक, मालखेड, आटके या गावांमध्ये वाटप करण्यात आले आहे. यावेळी डॉ. भोसले म्हणाले, पुरग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून, लागेल ते सहकार्य करण्याची भूमिका शासनाने घेतली आहे. शासनाने स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने पुनर्वसन कार्यात वेग घेतला असून, कराडच्या पूरग्रस्त भागातील नागरिकांना जवळपास 2 हजार 300 ब्लँकेटचे वाटप करण्यात येत आहे. पुराची हानी टाळण्यासाठी भविष्यात रेठरे बुद्रुक, खुबी, दुशेरे, कार्वे आणि कोडोली येथे पूरसंरक्षक भिंत उभारण्यात येणार असून, त्याला पालकमंत्री विजय शिवतारे यांनीही मान्यता दिली आहे. तसेच ज्या मार्गावर पुराचे पाणी येते, तिथे पर्यायी मार्गांची उभारणी करण्याचा शासनाचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले. पाटण येथे 4 हजार ब्लॅकेटचे वाटप आमदार शंभुराज देसाई यांच्या हस्ते  करण्यात आले आहे. आमदार श्री. देसाई यांनी तांबवे ता. कराड, बनपेठवाडी, जोतीबाचीवाडी व मारुल तर्फ पाटण येथे ब्लॅकेटचे वाटप केले. पाटण तालुक्यासाठी लवकरच आणखीन 4 हजार ब्लॅकेट पाठविणार असल्याचेही  पालकमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले आहे.

No comments