Header Ads

उंब्रज येथील 56 पुरग्रस्तांना सुरक्षीत स्थळी हलवले ; जिल्हाधिकाऱ्यांनी साधला पुरग्रस्तांशी संवाद satara

सातारा : कराड तालुक्यातील उंब्रज येथील ५६ पुरग्रस्तांना सुरक्षेतेच्या कारणास्तव जिल्हा प्रशासाने जिल्हा परिषदेत तात्पुरती निवाऱ्यांची सोय केली आहे. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आज उंब्रज येथील ५६ पुरग्रस्तांनी भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी या पुरग्रस्तांना अन्न व पाण्याची  सोय करण्याचे सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी कराडचे प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी नागठाणे जवळील उरमोडी नदीवरील पुलाची व उंब्रज येथील तारळी नदीवरील पुलांचीही पहाणी केली.

पुर परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे मिशन मोडवर काम सुरु

सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरपरिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापनासाठी अहोरात्र मिशन मोडवर काम करीत आहे. उद्भवलेल्या  पुरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील 598 कुटुंबे  तर 2 हजार 568 बाधित नागरिक आहेत. या नागरिकांची जिल्हा परिषद शाळा, नगर परिषद शाळा, अंगणवाड्या, समाजमंदिरामध्ये, मंदिरांमध्ये, तात्पुरते शेड उभे करुन  त्यांची तात्पुत्या निवाऱ्याबरोबर त्यांच्या अन्न पाण्याचीही सोय जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

No comments