Header Ads

धोम धरण पात्रात महिलेचा मृतदेह सापडला wai

वाई :  धोम धरण पत्रालगत गुरुवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास एका महिलेचा मृतदेह सापडला असून संबंधित महिला कातकरी समाजातील असल्याचे समजते. फुलवंती ( संपूर्ण नाव माहीत नाही) असे तिचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

भोगावचे पोलीस पाटील सदानंद मधुकर जाधव यांना आज सकाळी एक अनोळखी महिला धोम धरण पात्रालगत मृत अवस्थेत पडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिल्यानंतर जाधव यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता अंदाजे ४० ते ४२ वयोगटातील महिला रमेश दत्तू पोळ रा. भोगाव यांच्या धोम धरण पात्रालगत असलेल्या शेतामध्ये आढळून आला. याबातची माहिती पो. पाटील जाधव यांनी वाई पोलिसांना कळवली. पोलिसांनी महिलेबाबत चौकशी केली असता संबंधित महिला कातकरी समाजातील असून फुलवंती असे तिचे नाव आहे. गुरेबाजार सिद्धनाथवाडी येथे ती वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून रात्री उशिरा शवविच्छेदनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.या घटनेची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली आहे.

No comments