Header Ads

राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा अकॅडमीच्या ९ खेळाडूंची निवड sport

सातारा : अकोला येथे होणा-या राज्यस्तरीय सब ज्युनियर बॉक्सिंग स्पर्धेसाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवड चाचणी बॉक्सिंग स्पर्धेत सातारा बॉक्सिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी करत तब्बल ९ सुवर्ण पदकांची कमाई केली. सुवर्णपदक विजेत्या ९ खेळाडूंची अकोला येथील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

अकोला येथे दि. २१ ते २३ जून या कालावधीत होणा-या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी अकॅडमीच्या अथर्व गोंजारी (३५ते ३७ किलोवजनगट), प्रियांशु रणदिवे (४३ ते ४६ किलो), यश साठे (४० ते ४३ किलो), साईराज चव्हाण (४९ ते ५२ किलो), सुमित घाडगे (५२ ते ५५ किलो), शिवराज चोरगे (५५ ते ५८ किलो), अथर्व संकपाळ (६४ ते ६७ किलो), अभिवर्धन शर्मा (६७ ते ७० किलो) आणि साईराज पोतेकर (७० किलो पुढील) यांची निवड झाली. या यशाबद्दल आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, सचिव राजेंद्र हेंद्रे, सातारा बॉक्सिंग अकॅडमीचे अध्यक्ष हरिष शेट्टी, दौलतराव भोसले, रविंद्र होले, अमर मोकाशी, असिस्टंट कमांडंट प्रशांत जगताप, फिजीकल डायरेक्टर विकास जाधव, संजय पवार, विजय मोहिते, डॉ. राहूल चव्हाण, सुजाता भोसले, समीर बागल, प्रकाश साळवी, मयुर डिगे, अंकुश माने यांच्यासह सर्व पदाधिकारी व पालकांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

No comments