Header Ads

सातारा जिल्हात पूर्व मोसमी पावसाने थंडावा ; जिल्ह्यात ११.११ मि.मी पावसाची नोंद satara

सातारा : सातारा जिल्ह्यात काल पूर्व मोसमी पावसाने मोठा दिलासा दिला. मान्सून दोन-तीन दिवसात हजेरी लावणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हा पाऊस उष्णतेची लाट थोपविण्यासाठी आणि अनुकूल हवमान निर्माण होण्यासाठी महत्त्वाचा ठरला आहे. काल जिल्ह्यात अकरा तालुक्यांच्या क्षेत्रात एकूण पर्जन्यमान ११.११ मिलीमीटर एवढा पडली असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी सरासरी एवढा पाऊस होणार असल्याची माहिती आज जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सांगितली. सातारा जिल्ह्यात झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे-  सातारा-27.62 मि.मी., जावळी - 15.17 मि.मी., पाटण - 1.73 मि.मी.,  कराड - 1.23 मि.मी.,  कोरेगाव - 27.78 मि.मी.,  खटाव - 10.96 मि.मी., माण - 8.04 मि.मी., फलटण-1.89 मि.मी.,  खंडाळा-1.50 मि.मी., वाई -10.57 मि.मी.,  महाबळेश्वर-12.88 मि.मी.,  याप्रमाणे आजपर्यंत एकूण 119.35 मि.मी. तर सरासरी 11.11 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे.

No comments