Header Ads

डॉ. एन. डी. पाटील 'अंनिस'चे अध्यक्ष maha

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची जून २०१९ ते मे २०२२ या त्रैवार्षिक कालावधीसाठीची राज्य कार्यकारिणी निवड प्रक्रिया भोर येथे नुकतीच पार पडली. संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांची तसेच कार्याध्यक्षपदी अविनाश पाटील यांची फेरनिवड करण्यात आली.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कुशल व कल्पक नेतृत्वाखाली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाला १९८९ मध्ये सुरुवात झाली. संघटनेचे त्रिदशकपूर्ती वर्ष सुरू आहे. प्रा. डॉ. एन. डी. पाटील हे समितीच्या स्थापनेपासून अध्यक्ष आहेत. त्रैवार्षिक काळासाठी निवडण्यात आलेल्या उपाध्यक्षांमध्ये साहित्यिक उत्तम कांबळे, महादेवराव भुईभार, राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. श्यामराव पाटील, डॉ. सुरेश खुरसाळे यांचा समावेश आहे. संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष हे प्रत्यक्ष कामातील सर्वोच्च पद आहे. यापदी अविनाश पाटील (धुळे) यांची चौथ्यांदा पुनर्निवड झाली आहे. दाभोलकरांनी २०१०-२०११ मध्ये संघटनेचे नेतृत्व अविनाश पाटील यांच्याकडे सोपवले. ते संघटनेचे पंचवीस वर्षे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत. भारतातील सर्व विवेकवादी संघटनांचा समन्वय मंच असलेल्या फिरा (फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनल असोसिएशन) याचे अविनाश पाटील राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. संघटनेचे राज्य प्रधान सचिव म्हणून माधव बावगे (लातूर), सुशीला मुंडे (डोंबिवली), गजेंद्र सुरकार (वर्धा), संजय बनसोडे (इस्लामपूर), नंदकिशोर तळाशिलकर (मुंबई), प्रशांत पोतदार (सातारा) व मिलिंद देशमुख (पुणे) यांची निवड झाली आहे. 

No comments