Header Ads

साताऱ्यात रामराजेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळल्याने फलटणमध्ये तणाव satara

सातारा : नीरा देवधरच्या पाणी प्रश्नावर ना. रामराजे ना. निंबाळकर व खा. उदयनराजे भोसले यांच्यातील टीकेने वेगळे वळण घेतले आहे. सातारा येथे राजे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी रामराजे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळल्याने फलटण येथे या घटनेचा निषेध करून मोटारसायकल मोर्चा काढण्यात आला. या घटनेचा निषेध करत संपूर्ण फलटण शहर बंद केले. यावेळी संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण तयार झाले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अतिरिक्त पोलिस निरीक्षक धीरज पाटील यांनी शहरात येऊन घटनेची माहिती घेत चोख बंदोबस्त ठेवला. या पार्श्वभूमीवर रामराजे यांच्या निवास स्थनासमोर सुरक्षा ठेवली आहे.नीरा देवधरच्या पाणी प्रश्नावरून बारामती व इंदापूरला पाणी देण्यासाठी ना. रामराजे नाईक निंबाळकर हेच जबाबदार असल्याचा आरोप केला होता. या नंतर रामराजे यांनी पिसाळलेल्या कुत्र्याची टीका केल्याने राजघराण्याचा अपमान केला आहे, असा आरोप करत राजे प्रतिष्ठाणने सातारा येथे शनिवारी रामराजे यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला. या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी निषेधाच्या घोषणा देत संपूर्ण फलटण शहर बंद ठेवले. यामुळे फलटणमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे.

पंचायत समितीचे सदस्य विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांच्यां नेतृत्वाखाली फलटण शहरातून मोटार सायकल रॅली  काढण्यात आली. शहरातील महापुरुषांच्या पुतळ्याला हार घालून रामराजे यांचा 'विजय असो'च्या घोषणा देण्यात आल्या. तसेच प्रतिकात्मक पुतळा जाळल्याने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. संतप्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या घटनेच्या विरोधात घोषणाबाजी करून दुपारी फलटण बंदचे आवाहन केले. बंदला फलटणकर नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. अतिरिक्त पोलिस प्रमुख धीरज पाटील यांनी फलटणमध्ये भेट दिली. परिस्थितीचा आढावा घेऊन पोलिस बंदोबस्त ठेवला. संपूर्ण शहर बंद करण्यात आले आहे.

No comments