Header Ads

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी satara

सातारा : संघ लोकसेवा आयोग (UPSC) नवी दिल्ली यांचेमार्फत कोणत्याही शाखेच्या पदवीधर उमेदवारासाठी दिनांक 8 सप्टेंबर 2019 रोजी घेण्यात येणा-या कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस या संरक्षण दलातील अधिकारी पदाच्या परीक्षेकरिता दिनांक 12 जून 2019 रोजीच्या एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रसिध्द झाली आहे. संघ लोकसेवा आयोगाकडे ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दिनांक 8 जुलै 2019 अशी आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी www.upsconline.nic.in या वेबसाईटचा वापर करावा. कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस या परीक्षेद्वारा कायमस्वरूपी व अल्पमुदतीचे कमीशनसाठी निवड करण्यात येते.

कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतींसाठी दिनांक 18 जून  ते 31 ऑगस्ट 2019 या कालावधीत कम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस कोर्स क्र.58 चे आयोजन करण्यात येत आहे. सदर कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे. तरी सातारा जिल्हयातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा येथे दिनांक 14 जून 2019 रोजी संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येण्याआधी सैनिक कल्याण विभाग, पुणे यांची वेबसाईट www.mahasainik.com वरील Recruitment Tab  ला क्लीक करून किंवा गुगल प्लस मध्ये  PCTC Training असे सर्च करून त्यामधील कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस कोर्स क्र.58 साठी प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन ते पुर्ण भरून सोबत घेऊन यावे. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा दूरध्वनी क्रमांक 0253-245031 आणि 245032 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीवरून संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांनी केले आहे.

No comments