Header Ads

नायगावच्या विकासासाठी शासनाच्या योजना प्रभवीपणे राबवा : जिल्हाधिकारी श्वेता सिंघल satara

सातारा : नायगावच्या विकासासाठी शासन राबवित असलेल्या सर्व योजना प्रभावीपणे राबवा. ग्रामपंचायतीने  कशाकशाचा विकास करायचा आहे, त्यांचे प्रस्ताव द्या. कामे पाहून विकास कामांना निधी दिला जाईल, असे अश्वासन आज जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिले. नायगावच्या विकास कामांबाबत आज आढावा बैठक नायगाव ता. खंडाळा येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला प्राताधिकारी संगीता चौगुले, जिल्हा नियोजन अधिकारी बी.जे. जगदाळे, सरपंच सुधीर नेवसे, यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. लोणंद येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश क्षमता वाढविण्याचा प्रस्ताव शासनाकडे दिला आहे. तो प्रस्ताव माझ्याकडे द्या त्याचा पाठपुरावा केला जाईल.  कौशल्य विकास विभागाने नायगाव येथे मुलांसाठी एमपीसीचे वर्ग सुरु करावेत. त्याचा आराखडा तात्काळ तयार करुन माझ्याकडे सादर करावा. या वर्गांच्या व्यवस्थापनासाठी मानधन तत्वावर   कर्मचारी उपलब्ध करुन दिले जातील. तसेच वर्ग सुरु झाल्यानंतर सुरुवातीला प्रशासकीय अधिकारीही येथील मुलांना मार्गदर्शन करतील. तसेच सावित्रीबाई सृष्टी उभी करण्यासाठी जागेचा प्रस्ताव  द्यावा, अशा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सूचना केल्या.

No comments