Header Ads

अविनाश कोळपे यांची संगम माहुली ग्रामपंचायत सदस्यपदी बिनविरोध निवड satara

सातारा : येथील संगम माहुली ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीत युवानेते अविनाश कोळपे यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे. माजी सरपंच व विद्यमान चंद्रकांत कुंभार यांनी आपल्या सदस्यत्वचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या रिक्त जागेवर श्री.कोळपे यांची वर्णी लागली आहे.

कोळपे यांनी संगम माहुली व परिसरामध्ये विविध विकासकामे केली असून, वृद्ध नागरिकांसाठी पेन्शन योजना, ऐतिहासिक संगम माहुली परिसरातील महापुरुषांच्या असणाऱ्या समाधीचे जतन व देखभाल, राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध समाजउपयोगी उपक्रम, जेष्ठ नागरिकांसाठी वेळोवेळी आरोग्य शिबिरे तसेच युवांच्या मदतीने ग्रामस्वच्छता अभियानाची सुरवात व यासारख्या असंख्य उपक्रमात श्री.कोळपे हे सहभागी होत असतात. त्यांच्या निवडीचे आ.श्री.छ.शिवेंद्रराजे भोसले, आ.शशिकांत शिंदे, चिन्मय कुलकर्णी, हर्षल चिकने, संगम माहुली ग्रामस्थ, संरपच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, अविनाश कोळपे मित्र समूह, आजी-माजी सैनिक संघटना यांनी अविनास कोळपे यांची बिनविरोध निवड झाल्या बद्दल अभिनंदन केले.

No comments