Header Ads

सातारा जिल्ह्यातील पोलीस आधीकार्‍यांच्या बदल्या ; शाहुपूरी पोलीस ठाण्याचे धुमाळ यांची कराड ग्रामीण तर सातारा शहरचे चौगुले यांची शाहुपूरीला बदली satara

सातारा : सातारा जिल्ह्यातील विविध पोलीस आधीकारी व कर्मचार्‍यांच्या बदल्या जिल्ह्याअंतर्गत करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी या बदल्या केल्या आहेत. महाराष्ट्रपोलीस अध्यादेश २०१५ व महाराष्ट्र पोलीस अधिनयम १९९१ चे कलम २२ च्या तरतुदीनुसार जिल्हास्तरीय पोलीस अस्थापन मंडळ यांच्या शिफारशी नुसार व मान्यतेने विविध पोलीस आधिकारी यांचे सध्याचे पोलीस ठाणे ठिकाणी विहित कालावधी पूर्ण झाल्याने सदर पोलीस आधिकारी यांची बदली जिल्हाअंतर्गत जनहितार्थ व प्रशासकिय कारणास्तव बदली करण्यात आलेली आहे.

अशोक दगडू क्षीरसागर पोलीस निरीक्षक यांची कराड तालुका पोलीस ठाणे येथून मानवी संसाधन पोलीस कल्याण येथे बदली करण्यात आली आहे तर शाहुपूरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर मारूती धुमाळ यांची कराड तालुका पोलीस ठाणे येथे बदली करण्यात आली आहे. सुभाष निगाप्पा चौगुले (सपोनि) यांची सातारा शहर पोलीस ठाणे येथून शाहुपूरी पोलीस ठाणे येथे बदली करण्यात आली आहे. संतोष सोपान चौधरी (सपोनि) यांची बोरगाव येथून लोणंद येथे तर वर्षा सहदेव डांळिंबकर पोलिस उपनिरिक्षक यांची सातारा शहर पोलीस ठाणे येथून शाहुपूरी पोलीस ठाणे येथे, धरणीधर बाबा कोळेकर पोलीस उपनिरीक्षक यांची वडूज येथुन शाहुपूरी येथे, वृक्षाली अशोक देसाई पोलीस उपनिरीक्षक फलटण येथून शिरवळ येथे, राहुलकुमार रामेश्‍वर भोळ पोलीस उपनिरीक्षक फलटण ग्रामिण येथून फलटण शहर येथे,गणेश वसंत पवार पोलीस उपनिरिक्षक यांची लोणंद येथून फलटण येथे, महेश किसनराव कदम पोलीस उपनिरिक्षक यांची खंडाळा येथून लोणंद येथे झाली.
तर एक वर्षे मुदत वाढ देण्यात आलेले पोलीस आधीकारी खालील प्रमाणे, दुर्गादास रामनाथ साळी भुईज, सदाशिव दिनकर शेलार कराड, रूपाली संभाजी चव्हाण कराड शहर, भरत मोहन चंदनशिव कराड शहर, प्रकाश मानसिंग जाधव अप्पर पोलीस अधीक्षक यांचे वाचक रविराज रामचंद्र घाडगे फलटण, व शशिकांत पांडूरंग बर्गे वाई,  शशिकांत घाडगे नियंत्रण कक्ष यांना बिडीडीएस व श्‍वान पथक यांचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे. आशिष जाधव जिल्हा विशेष शाखा येथून कराड शहर पोलीस ठाणे, अनिल सावळा पाटिल वडूज येथून सातारा शहर पोलीस ठाणे, चंद्रकांत माळी सपोनि कराड तालुका येथुन ते बोरगाव, बाजीराव ढेकळे सपोनि सातारा शहर येथुन स्थानिक गुन्हे शाखा, उत्तम भापकर सपोनि पाटण येथून औंध येथे, विठ्ठल अरूण शेलार सपोनि शाहुपूरी येथून सातारा शहर वानिशा, श्रीमती तृप्ती सोनवणे सपोनि पाचगणी येथून पाटण येथे, गजानन कदम सपोनि स्थानिक गुन्हे शाखा येथुन पोलीस अधीक्षक यांचे वाचक पदी, ज्ञानेश्‍वर दळवी पोलीस उपनिरिक्षक फलटण शहर ते फलटण यथेच, शहाजी गोसावी पोलीस उपनिरिक्षक म्हस्वड येथुन वडूज येथे शशिकांत मुसळे स्थानिक गुन्हे शाखा ते औध, भैरीनाथ कांबळे शाहुपूरी ते कराड शहर, शिवराम खाडे सातारा शहर ते कराड शहर पोलीस नियंत्रण शाखेतुन पोलीस निरिक्षक यांच्या करण्यात आलेल्या बदल्या पुढिल प्रमाणे अशोक पाटील वडूज, उमेश हजारे  सायबर पोलीसठाणे सातारा,रामचंद्र देसाई मानवी संसाधन पोलीस कल्याण, सुनिल गोडसे कोरेगाव, नितिन सावंत आर्थिक गुन्हे शाखा, अशोक कदम सुरक्षा सातारा, विकास बडवे पाचगणी पोलीस स्टेशन, जयश्री पाटील तळबीड, राजकुमार भूजबळ दहिवडी, स्वप्नील घोंगडे वाठार, मोहन तलवार शिरवळ, भानुदास पवार सातारा शहर, दत्तात्रय भोसले शाहुपूरी मुगूटलाल पाटील शाहुपूरी, श्रीमती जमदाडे कराड शहर,श्रीमती बीडी पाटील सातारा शहर यथे बदली करण्यात आली आहे.

No comments