Header Ads

खंडाळा तालुक्यात टंचाई गावांना एक महिना पुरेल ऐवढा हिरवा चारा उपलब्ध satara

सातारा : विविध यंत्रणामार्फत खंडळा तालुक्यातील टंचाई भागांची पाहणी अहवाल सादर करण्यात आला आहे. या  अहवालानुसार जनावरांसाठी एक महिना हिरवा चारा पुरेल ऐवढा हिरवा चारा उपलब्ध आहे, अशी माहिती खंडाळ्याचे तसहीलदार दशरथ काळे यांनी दिली आहे.

खंडळा तालुक्यात सध्या झगलवाडी, लिंबाचीवाडी व घाडगेवाडी या तीन ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. टंचाई आराखड्यानुसार विविध कामांचे १३ अंदाजपत्रक प्राप्त झाले असून ११ मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये हरताळवाडी प्रादेशिक योजनेची दुरुस्तीही करण्यात येणार आहे. तसेच टंचाईच्या उपाययोजनांसाठी एकूण ९ विहिरी अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत. घाटदरे व खेड या गावांनी टँकरची मागणी केली असून अहवाल प्राप्त होताच एक-दोन दिवसात  कार्यवाही करण्यात येणार आहे. टंचाई घोषीत केलेल्या ३६ गावांमध्ये ३० हजार ७१५ जनावरे असून या जनावरांना एक महिना पुरेल एवढा चारा उपलब्ध असल्याची माहितीही तहसीलदार श्री. काळे यांनी दिली आहे.

No comments