Header Ads

जिल्ह्यात चार ठिकाणी विषप्राशन ; सर्वांवर क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू satara

सातारा : सातारा जिल्ह्यात चार ठिकाणी विषप्राशनाच्या घटना घडल्या आहेत. यापैकी एकजण परप्रांतीय असून अन्य दोघे सातारा जिल्ह्यातील आहेत. यामध्ये एक विवाहिता असून या सर्वांवर क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संबंधित चार ही घटनांची नोंद त्या-त्या पोलीस ठाण्यात झाली आहे.

सातारा शहरालगत असणाऱ्या कोडोली येथील धनगरवाडी, मातंग वस्तीत राहणाऱ्या नीलम सुहास अवघडे (वय २०) यांनी रविवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास विषारी पावडर खाल्ली. ही घटना लक्षात आल्यानंतर नीलम यांना पती सुहास आणि नीलम यांची आई नंदा कैलास कांबळे, भाऊ सुरज यांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. या घटनेचे कारण समजू शकले नाही. कोरेगाव तालुक्यातील ल्हासुरणें येथील आशाबाई ईलाराम बगाड (वय २०) यांनी राहत्या घरी सकाळी दहा वाजता विषप्राशन केले. जिल्हा रुग्णालयात आशाबाई यांच्यावर उपचार सुरू आहेत. येथून मिळालेल्या माहितीनुसार किरकोळ कारणावरून रागाच्या भरात आशाबाई यांनी कीटकनाशक प्राशन केले. दरम्यान ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांना तत्काळ उपचारासाठी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वाई येथे वीरेंद्र सुखचंद मारफाम (वय २०, रा. आसोंगेली, ता. लांगजी, जि. बालाघाट, राज्य - मध्यप्रदेश) यांनी उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले. या घटनेनंतर त्यांना वाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात  उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, अधिक उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सातारा तालुक्यातील वनगळ येथील शिरीष शिवाजी साळुंखे (वय ६०) यांनी विषारी औषध प्राशन केले. यामागील नेमके कारण स्पष्ट झाले नाही. ही घटना लक्षात आल्यानंतर मुलगा अमित साळुंखे याने त्यांना तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

No comments