Header Ads

मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी धारवाडच्या ट्रॅव्हल्स चालकावर गुन्हा satara

सातारा : साताऱ्यातील सदरबझार येथील अशोक जगन्नाथ पाटील (वय ६५, रा. सदरबझार) यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी धारवाड येथील ट्रॅव्हल्स चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मंजुन्नाथ हुचाप्पा होसळी (वय ३८) असे चालकाचे नाव आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की,  सातारा शहरालगत महामार्गावर खेडलगत पादचारी अशोक जगन्नाथ पाटील यांना शुक्रवार, दि. २0 रोजी ट्रॅव्हल्सने धडक दिली होती. या धडकेत अशोक पाटील यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या अपघातानंतर पोलीस हवालदार शशिकांत भोसले यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे.

No comments