Header Ads

युरोपच्या धर्तीवर सातारचे संग्रहालय व्हावे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंची अपेक्षा satara

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेल्या छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालयाचे काम इतक्या वर्षे रखडत असल्याबाबत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र आता या कामात दिरंगाई होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. युरोपच्या धर्तीवर सातार्‍यातील वस्तुसंग्रहालय बनावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.यावेळी त्यांनी पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांकडून सध्याच्या शिवाजी वस्तुसंग्रहालयात असलेल्या ऐतिहासिक वस्तुंची माहिती घेतली. लवकरच पुण्यात पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांसमवेत एक बैठक घेवून आतील इंटिरियर कसे असावे ? आणखी काही बदल करता येतील का ? याबाबत नियोजन करण्याचा निर्णय घेतला. यावेळी खा.श्री.छ.उदयनराजे भोसले, पुरातत्व व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थितीत होते. 

1 comment: