Header Ads

नायगाव येथे १९ जून रोजी महिला मेळावा ; मेळाव्यात नैपूण्य प्राप्त महिलांचा होणार सत्कार : जिल्हाधिकारी श्वेता सिंघल satara

सातारा : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्म गाव मौजे नायगाव ता. खंडाळा या गावाला ‘ब’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा मिळालेला असून या निमित्ताने यासाठी 19 जून रोजी सकाळी 11 वाजता नायगाव येथे महिला मेळावा व नैपूण्य प्राप्त महिलांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्वेता सिंघल दिली आहे. या महिला मेळाव्यास व सत्कार कार्यक्रमास जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासह जिल्ह्यातील महिला अधिकारी व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या महिला मेळाव्यात नैपूण्य प्राप्त महिलांचा सत्कारही करण्यात येणार आहे. तसेच महिलांसाठी असणाऱ्या शासनाच्या विविध योजनांचे सादरीकरण या मेळाव्यात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले आहे.

No comments