Header Ads

अन्न व औषध प्रशासनाची वाई येथील हाळद व्यापा-यावर कारवाई satara

सातारा : अन्न व औषध प्रशासनाकडून वाई तालुक्यातील दिपचंद प्रतापचंद जैन मालक यांच्या मे. डायमंड कंपनी, शाहबाग फाटा,वाई यांच्यावर आज  यांचेकडे अचानक तपासणी केली असता नियम मोडून  हळद  पावडर विकत असल्यामुळे कारवाई करण्यात आली असल्याची माहिती आज अन्न व औषध प्रशासनाकडून सांगण्यात आले. या व्यापा-याकडून  छापलेल्या बॅगवर उत्पादकाचा दिनांक, बॅच नंबर, तसेच उत्पादकाचा पत्ता नसल्याचे आढळुन आले. या लेबलवर  सेलम सांगली असे  उल्लेखित करुन सदर हळद पावडर ही सांगली येथील असल्याचे भासविले जात असल्याचे आढळुन आल्यामुळे 16 लाख 99 हजार 600 रुपये किमतीचा  16 हजार 996 किलो चा साठा जप्त करण्यात आला. या ठिकाणी तपासणीवेळी हळद पावडरच्या गुणवत्तेबाबत कोणतेही विश्लेषण केलेले नाही.

संदीप सुरेशराव कोरडे मालक यांच्या मे. कोहीनुर स्टॉल, शाहबाग  फाटा,वाई येथे तपासणी केली असता हळदपावडरच्या लेबलवर चुकीचा नोंदीणी क्रमांक नमुद केलेला आहे. तसेच मिरची पावडर व कांदा लसून मसाला या अन्न पदार्थाच्या पॅकेटवर लेबल नसल्याचे आढळुन आले असून 382  किलो , रुपये 59 हजार 460 किमतीचा साठा जप्त केला आहे. तसेच  येथील इतर  10 अन्न व्यवसायकांची तपासणी करुन अन्न् सुरक्षा व मानदे कायद्यातील नियमावलीचे पालन करुन अन्न पदार्थाची विक्री करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले . सदर कारवाई शिवकुमार कोडगीरे, सहायक आयुक्त (अन्न),सातारा याच्या पथकांने अन्न सुरक्षा अधिकारी अनिल पवार,रोहन शहा, युवराज ढेंबरे, विकास सोनवणे, नमुना सहाय्यक सुनिल सर्वगोड यांनी व सुरेश देशमुख, सहआयुक्त,पुणे विभाग यांच्या मार्गदर्शनाखली करण्यात  आलेली आहे.

No comments