Header Ads

जिल्हाधिकाऱ्यांनी केली खटाव तालुक्यातील एणकूळ चारा छावणीची पहाणी satara

सातारा : सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, उत्तर कोरेगाव व फलटण या तालुक्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता वाढलेली आहे. यासाठी शासनाने मोठया प्रमाणात जनावरांसाठी चारा छावण्या व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी खटाव तालुक्यातील एणकूळ येथील चारा छावणीस दि. 4 जून रोजी भेट देऊन चारा छावणीतील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, खटावच्या तहसिलदार अर्चना पाटील, खटावचे पशुवैद्यकीय अधिकारी आदि उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी जनावरांना चारा, पाणी , पेंड व्यवस्थित मिळतो का याची विचारपूस केली. तसेच पशुवैद्यकीय अधिकारी रोज चारा छावणीस भेट देतात का याबाबतही शेतकऱ्यांशी चर्चा केली. एणकूळ या चारा छावणीत आज घडीला लहान 88 व मोठी 487 अशी एकूण 575 जनावरे आहेत. या चारा छावणीत शासनाच्या निकषानुसार जनावरांना चारा, पेंड, पाणी याचबरोबर त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली  जाते. शेतकरी श्री. प्रकाश दाजी ठोले म्हणाले की, माझी 2 जनावरे आहेत. एका जनावरास 18 किलो चारा, अर्धा किलो पेंड दिली जाते. या चारा छावणीत माळशिरस येथून जनावरांसाठी चारा आणला जातो. यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी चारा छावणीत स्वच्छता राखा अशा सूचना दिल्या तसेच हालचाल रजिस्टर, छावणी भेट रजिस्टर, चारा वाटप रजिस्टर, चारा स्टॉक रजिस्टर, पेंड स्टॉक रजिस्टरची तपासणी केली.

No comments