Header Ads

आयुष्यमान वाढविण्यासाठी प्रत्येकाने योगासने करावीत : खा.श्री.छ. उदयनराजे भोसले satara

सातारा : आपल्या जीवन शैलीमुळे आयुष्यमान कमी होत चालले आहे. निरोगी आयुष्यासाठी व  आयुष्यमान वाढविण्यासाठी प्रत्येकाने योगासने केला पाहिजे, असे आवाहन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज केले. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालयातील आयुष विभाग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांच्या संयुक्त विद्यमाने येथील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक आदी उपस्थित होते.

शक्ती आणि युक्तीची सांगड घातली तर माणूस निरोगी राहू शकतो व निरोगी आयुष्यामुळे ठरवलेले ध्येय गाठू शकतो यासाठी प्रत्येकाने आपल्या दिवसाची सुरुवात योगाने करावी, असे सांगून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. प्रत्येकाने दिवसाची सुरुवात ही व्यायामाने केली पाहिजे. कमीत कमी दररोज 20 मिनिटे रोज चालण्याचा व्यायाम तरी केला पाहिजे. शारिरीक व मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रत्येकाने योग केला पाहिजे. यामुळे ताण-ताणव तर कमीच होतोच आपले आरोग्यही चांगल्या पद्धतीने राहते. मुलांनी अभ्यासाबरोबर शारिरीक व्यायामालाही महत्व दिले पाहिजे. योगामुळे मानसिक विकास होते. यासाठी प्रत्येकाने योग जीवनाचा अविभाज्य घटक बनवा,  असे सांगून जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध योगा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित योगाची आसने करण्यात आली. याप्रसंगी विविध विभागांचे अधिकारी,  कर्मचारी,  नागरिक, महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments