Header Ads

काही व्यक्तींकडून श्री.छ. शाहू स्टेडीयमच्या विस्तीर्ण वास्तुचे क्रीडा संकुलाच्या नावाखाली व्यापारी संकूल satara

सातारा : तत्कालिन काही व्यक्तींनी एकत्र येवून, सातारा येथील नगरपरिषदेच्या ताब्यात असलेले श्री.छत्रपती शाहू स्टेडीयमच्या विस्तीर्ण वास्तुचे क्रीडा संकुलाच्या नावाखाली व्यापारी संकूल निर्माण केले आहे. इतकं करुनही कोणत्याच खेळाडूंना मैदानाचा मनसोक्त वापर करता येत नाही. तर प्रेक्षकांना देखिल चांगले सामने पहाता येत नाहीत. तथापि झालं ते झालं, आता या स्टेडीयमवर किमान आयपीएल किंवा रणजी सामने तरी खेळवले जातील अशी खेळपट्टी तयार करा, आवश्यकता असेल तर जुनी इमारत पाडा, स्टेडीयमच्या लगत असलेली पोलिस ग्राउडची काही जागा संपादीत करा, जिल्हा क्रीडा संकूल संमितीवर प्रत्येक क्रीडा संघटनेच्या प्रतिनिधींना स्थान देण्याची तरतुद नसेल तर ती तरतुद करा, अश्या शब्दात परंतु आंतरिक तळमळीच्या भाषेत आज सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांना सूचना केल्या. सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज सातारच्या श्री.छ.शाहू स्टेडीयम तथा जिल्हा क्रीडा संकुलाचे आवारास भेट देवून, क्रीकेटचे टर्फ-मैदान आणि अॅथलेटिक ट्रॅकची पहाणी केली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, क्रीडासंघटनांचे ईर्शाद बागवान, मनोज कान्हेरे, जिल्हापरिषद सदस्य सुनील काटकर, रॉबर्ट मोझेस, जितेंद्र खानविलकर, रणजीत सावंत, आदी मान्यवर उपस्थित होते.

क्रीडा संकूल समितीमध्ये कोणाचाही एककल्ली कारभार चालणार नाही, आमच्या माहीतीप्रमाणे क्रीडा संकूल समिती एक नोंदणीकृत संस्था आहे. या संस्थेच्या घटनेमध्य प्रत्येक क्रीडा संघटनेच्या प्रतिनिधींना स्थान देण्याची तरतुद नसेल तर ती करावी लागेल. क्रीडा संघटना आणि खेळाडूंना महत्व दिले तर क्रीडा प्रसार आणि क्रीडा प्रचार होईल, संकूल समितीवर महसुल व प्रशासकीय अधिका-यांचा, खेळाच्या प्रसारासाठी किती उपयोग झाला. कीडा संकुलाची प्रेक्षा गॅलरी अत्यंत विचित्र आहे, अशी गॅलरी अन्य कुठे असेल असे वाटत नाही,पुढे बसणा-याला वाकुन पहावे लागते. सदरचे काम सुरु असताना आम्ही गॅलरीबाबत आक्षेप.-विचारणा केली तर आमच्यावर ट्रेसपासर चा गुन्हा दाखल केला गेला. आता जमिनीपर्यंत गॅलरीची व्यवस्था करावी लागेल, येथील ग्राउंडवर आयपीएल,रणजी अश्या स्पर्धाचे सामने झाले पाहीजेत तरच सातारा जिल्ह्यातील प्रेक्षकांना खेळाचा आनंद लुटता येईल व खेळाडूंनाही सातत्याने प्रेरणा मिळेल, आमच्या माहीतीप्रमाणे वाईचे अफजल पठाण आणि सातारचे महेश कारंजकर या दोन रणजी क्रीकेटपटू शिवाय तिसरा रणजीपट साता-यातुन झालेला नाही. याला आपण सर्वजण जबाबदार आहोत, लहानपणापासून खेळाडूंना प्रोत्साहन व सुविधा देण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे, सातारचे क्रीडा संकूल असुन अडचण आणि नसून खोळंबा अश्या अवस्थेत गेले आहे. त्यामुळे याठिकाणी आयपीएलचे सामने होतील अश्या आतर्राष्ट्रीय मानका प्रमाणे खेळपट्टी आणि क्रीकेटचे मैदान करण्यासाठी तसेच अॅथलेट्रीक ट्रैक करीता, भले जुनी इमारत पाडावी लागली तर पाडा, शेजारची जागा संपादन करा पण ज्या सुधारणा झाल्या पाहीजेत त्या त्या सुधारण करुन द्या, त्याकरीता आमचे लागेल ते सहकार्य राहील असे स्पष्ट केले. दरम्यान खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रत्यक्ष जागेवर जावून तसेच याबाबत तयार करण्यात आलेल्या नकाशा ड्रॉईंगची पहाणी केली. यावेळी मोठया संख्येने खेळाडू व नागरीक उपस्थित होते.

No comments