Header Ads

मोहसीन शेख व डॉ. पायल तडवी यांच्या न्यायासाठी साताऱ्यात धरणे आंदोलन satara

सातारा : धार्मिक कट्टरवाद्यांकडून हत्या झालेला मोहसीन शेख आणि छळ झाल्याने आत्महत्या करण्यास भाग पडलेल्या डॉ.पायल तडवी यांना न्याय मिळावा, शासनाने आश्वासन दिलेल्या बाबींची पूर्तता करावी तसेच देशभरात अल्पसंख्यांकांबाबत होणारा भेदभाव आणि हल्यांबाबत परिणामकारक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने नवा कायदा गठीत करावा. या मागणीसाठी आज सोमवारी सातारच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध संघटनांच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. मुस्लिम जागृती अभियान, मुस्लिम ओबीसी संघटना, सातारा शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्था तसेच परिवर्तनवादी संघटना समन्वय समिती या संघटनांच्या पुढाकाराने हे धरणे आंदोलन करण्यात आले.

पाच वर्षापूर्वी मोहसीन शेख याची धार्मिक कट्टरवाद्यांनी हत्या केली. त्यावेळी सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे त्याच्या भावाला सरकारी नोकरी मिळाली नाही ती त्वरित द्यावी, मोहसीनच्या कुटुंबाला उर्वरीत आर्थिक मदत त्वरित द्यावी, या खटल्यासाठी विशेष सरकारी वकीलाची नियुक्ती करण्यात यावी तसेच डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरणी संबधीतांना कडक शासन व्हावे या व इतर मागण्यांचे निवेदन यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांना देण्यात आले. आंदोलन ठिकाणी गुलाब शेख, कॉ. वसंतराव नलावडे, विजय मांडके, मिनाज सय्यद, जाकिर शिकलगार, रोहित क्षिरसागर यांची भाषणे झाली. व अल्पसंख्याक समाजाबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यावर सर्वांनी भर दिला. या धरणे आंदोलनात हेमा सोनी, प्रा.डॉ.शिवाजीराव पाटील, प्रा. सुनील गायकवाड, राजन कुंभार, अहंमद कागदी, तौसिफ शेख, मुजफ्फर सय्यद, जयंत उथळे, भगवान अवघडे, सुभाष जाजू, सलिम आतार, अमर गायकवाड, अरिफ बागवान, नंदकुमार चोरगे, दिलिप भोसले, महेश गुरव, शुभम ढाले, संकेत माने-पाटील, अनिकेत मोहिते, अनिल मोहिते आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

No comments