Header Ads

देशातील ३७६ मतदारसंघात ईव्हीएम मशीनमधील मतांच्या आकडेवारीत घोळ ; मी राजीनामा देतो सातारा लोकसभा मतदारसंघात फेरमतदान घ्या : खा.उदयनराजे satara

सातारा : देशभरातील ३७६ मतदारसंघामध्ये ईव्हीएम मशीनमधील मतांच्या आकडेवारीत घोळ झाला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान व मतमोजणी यांच्यामध्ये चकक ६७२ मतांचा फरक आहे. मला सातारा जिल्हयात साडेतीन लाखाचे मताधिक्कय आहे. मी आत्ता राजीनामा देतो या मतदारसंघात फेरमतदान घ्या. असे खुले आव्हान खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला देत ईव्हीएम मशीनवरून होणाऱ्या निवडणूकांना जोरदार आक्षेप घेतला. येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

खा.उदयनराजे पुढे म्हणाले, ईव्हीएम मशीनच्या वैधतेबाबत कायदेपंडितांनी जी ठामपणे विधाने केली ती कोणत्या आधारावर केली. क्विंट नावाच्या  माध्यमाने प्रत्यक्ष मतदान व निवडणूकीनंतर आलेली आकडेवारी यातील तफावत दाखवली तेव्हा ती आकडेवारी निवडणूक आयोगाने तत्काळ वेबसाईटवरून हटविली. निवडणूक हा जनतेच्या पैशावर होत त्याची उधळपट्टी करण्याचा अधिकार कोणाला नाही. एक हजार मते मोजणाऱ्या एका ईव्हीएम मशीनची किंमत तेहतीस हजार म्हणजे एका मताची किंमत १ रूपये ३० पैसे. आणि बॅलेट पेपरने इलेक शन घेतल्यास अवघा तेराशे  रुपये खर्च. ईव्हीएम मशीनवर तब्बल ४५५५ कोटी रूपये खर्च झाला. जर ईव्हीएम मशीन निर्वेध होत्या मग सहा विधानसभा मतदारसंघात ६७२ मतांचा फरक कसा पडला ? असा सवाल उदयनराजे यांनी केला. वाई मतदारसंघात ३४४ कोरेगाव मतदारसंघात ५ कराड उत्तर मतदारसंघात १४८ कराड दक्षिण मध्ये ५ पाटण मतदारसंघात ९७ सातारा विधानसभा मतदारसंघात ७५ अशा ६७२ मतांचा फरक पडल्याचे उदयनराजे भोसले यांनी कागदपत्रांच्या आकडेवारी वरून दाखवून दिले. सातारा लोकसभा मतदारसंघात आपल्याला खात्रीने साडेतीन लाखाचे मताधिक्य आहे. असा दावा उदयनराजे यांनी करून मी राजीनामा देतो पुन्हा फेरमतदान होऊ दे तितक्याच मताधिक्कयाने निवडून येईल असा दावा त्यांनी करत निवडणूक आयोगाची बॅलेट पेपरद्वारे फेरनिवडणूक घेण्याची तयारी आहे का ? असा सवाल त्यांनी केला. ईव्हीएम मशीनमुळे लोकशाही धोक्यात आल्याचा आरोप उदयनराजे यांनी करत ही यंत्रणा म्हणजे देशाच्या व्यवस्थेला लागलेली कीड आहे ते उखडून टाकायला हवी अशी अपेक्षा व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाने अधिकाराने या विषयावर भाष्य करायला हवे, मात्र या विषयावर दाद मागणाऱ्या लाच कारवाईची भाषा वापरली जाते हे चुकीचे असल्याचे मत उदयनराजे यांनी व्यक्त केले. उदयनराजे कधी रडीचा डाव खेळत नाही, लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या या यंत्रणेपेक्षा राजेशाही काय वाईट होती ? या प्रकाराला वेळच पायबंद घातला नाहीतर १८५७ च्या बंडाप्रमाणे सर्वत्र रक्तपात होऊन सारी व्यवस्था नष्ट होईल अशी भीती उदयनराजे यांनी व्यक्त केली.

No comments