Header Ads

जावलीच्या सर्वांगिण विकासासाठी कधीही कमी पडणार नाही : आ. शिवेंद्रराजे satara

सातारा : सातारा-जावली मतदासंघाचे नेतृत्व करताना विकासकामांच्या बाबतीत सातारा आणि जावली असा कधीही भेदभाव केला नाही. साता-यासह जावली तालुक्यातील प्रत्येक गावात आणि वाडी- वस्तीवर विकासकामे पोहचवली आहेत. दुर्गम आणि डोंगराळ जावली तालुक्याचा कायापालट केला असून जावली तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी कधीही कमी पडणार नाही, असा शब्द आ.श्री.छ.शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला. करंदी ता. जावली येथे आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रयत्नातून अंर्तगत रस्ता काँक्रीटीकरण (आमदार फंड ९ लाख), कोयना भुकंप पुनर्वसन निधीतून करंदी हायस्कूल इमारत बांधकाम(१०लाख) आणि ५०/५४ योजनेतून करंदी ते राणगेघर रस्ता डांबरीकरण (२० लाख) ही कामे मंजूर झाली असून या कामांचा शुभारंभ करताना आ. शिवेंद्रराजे भोसले बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, सदस्या सौ. अर्चना रांजणे, जावली पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रय गावडे, सदस्य सौरभ शिंदे, सौ. अरुणा शिर्के, विजय सुतार, कांताताई सुतार, ज्ञानश्री उद्योग समुहाचे सचिव ज्ञानदेव रांजणे, प्रतापगड सह. साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब निकम, करंदी ग्रामपंचायतीचे सरपंच सर्जेराव निकम, उपसरपंच स्वाती निकम, माजी सरपंच संतोष निकम, विकाससेवा सोसायटीचे चेअरमन नथु निकम, शंकरराव शिर्के, पोलीस पाटील अनिल निकम, प्रताप निकम, किशोर निकम, गणेश निकम, संतोष संपत निकम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रत्येक गावाची समस्या जाणून घेवून ती समस्या सोडवण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न केला आहे. ग्रामस्थांना काय हवं आहे, त्यांच्या इच्छेनुसार त्या- त्या गावात विकासकामे टाकली आहेत. प्रत्येक गाव, वाडी, वस्ती डांबरी रस्त्याने जोडली गेली असून अनेक ठिकाणी काँक्रीटचे रस्ते तयार करुन दळणवळणाचा प्रश्न निकाली काढण्यात आला आहे. आगामी काळातही प्रत्येक गावाचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध केला जाईल आणि विकाकामांच्या बाबतीत जावली तालुका आदर्श ठरेल, असेही आ. शिवेंद्रजे यांनी याप्रसंगी सांगितले. गावात विकासकामांच्या माध्यमातून समस्यांचा निपटारा केल्याबद्दल आ. शिवेंद्रराजे यांचा करंदी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्यावतीने सत्कार करुन आभार मानन्यात आले.

No comments