Header Ads

शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी खा.श्री.छ उदयनराजे घालणार तुळजाभवानीला साकडं satara

सातारा : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर खा.श्री.छ.उदयनराजे भोसले हे महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये जाऊन भेटी देत आहेत. नुकतीच ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने त्यांनी रायगडावर उपस्थिती लावली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दुष्काळी दौऱ्यातदेखील अनेक ठिकाणी ते उपस्थित होते. यावर्षी महाराष्ट्रातील जनता मोठ्या दुष्काळाला सामोरं गेली असून, जुन महिन्याने मध्यान गाठले तरी अजून बळीराजाला पावसाची आस आहे. संकटाच्या गर्तेत अडकलेल्या शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट १३ वंशज खा.श्री.छ.उदयनराजे भोसले महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या आई तुळजाभवानीला साकडं घालणार आहेत.

दरम्यान खा.उदयनराजे दि.१३ जून रोजी दुपारी ३ वाजाता सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील चारा छावणीला भेट देऊन छावणीतील शेतकऱ्यांसमवेत संवाद साधणार आहेत. त्यानंतर दुपारी ४ वाजता तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे विट्ठल-रखुमाईची पूजा करून दर्शन घेणार आहेत. दि.१४ रोजी सकाळी ५.३० वाजता महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीची मनोभावे पूजा करून राज्यातील शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी देवीला साकडं घालणार आहेत. सकाळी १०.३० वाजता सोलापूर येथील सिद्धेश्वर दर्शन व हजरत शाह दर्ग्याला भेट देणार आहे. त्यानंतर ११.३० वाजता सोलापूर जिल्हातील प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती संग्राम बर्गे यांनी दिली.

No comments