Header Ads

सुधारीत गोवर्धन गोवंश सेवाकेंद्र योजनेच्या लाभासाठी अर्ज भरण्याचे आवाहन satara

सातारा : गोवंशाचा सांभाळ करण्यासाठी (भाकड गायी/अनुत्पादक किंवा निरुपयोगी बैल, वळु इ) गोशाळांना अर्थसहाय्य देण्याकरिता शासनाने सुधारीत गोवर्धन गोवंश सेवा केंद्र राबविण्यास मान्यता प्रदान केली आहे. (ही योजना जिल्ह्यामध्ये महसूल उपविभाग निहाय प्रत्येकी १ गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रमाणे वाई महसूल उपविभाग वगळता राबविली जाणार आहे.) या योजनेअंतर्गत गोशाळांना पशुधनाचा सांभाळ करण्यासाठी नवीन पशु शेडचे बांधकाम, चाऱ्याची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैरण उत्पादनासाठी पाण्याच्या उपलब्धतेकरीता विहीर/बोअरवेल, कडबा कट्टी यंत्र, मुरघास प्रकल्प, गांडुळखत निर्मिती प्रकल्प, गोमुत्र व शेण यांपासून उत्पादन निर्मिती प्रकल्प व विक्री केंद्र इ. मुलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी व इतर अनुषंगिक बाबींसाठी रक्कम रुपये २५ लाख इतके अनुदान एकवेळचे अर्थसहाय्य म्हणून देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील गोशाळा चालकांनी त्वरीत आपले तालुक्यामधील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधून योजनेची सविस्तर माहिती, योजनेचा अर्ज व अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे इ. माहिती करुन घेवून परिपूर्ण प्रस्ताव दि. ३० जून २०१९ अखेर पाठवावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. अंकुश परिहार, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी केले आहे.

No comments