Header Ads

दहावी नापास झाल्याने विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न satara

सातारा : दहावी नापास झाल्याने नैराश्यातून ऋतूजा राजू वाघमारे वय-१७, रा.मंगळवार पेठ, सातारा हिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. ऋतुजावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबात पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ऋतूजा ही साताऱ्यातील एका शाळेत शिकत आहे. शनिवारी दहावीचा निकाल लागल्यानंतर ती नापास झाल्याचे तिला समजले. या नैराश्यातून तिने राहत्या घरात डेटॉल घेतले. त्यानंतर तिला त्रास होऊ लागल्यानंतर हा प्रकार घरातल्यांच्या निदर्शनास आला. तिला तत्काळ तिच्या आईने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

No comments